कंपनी PF चे पैसे जमा करत नसेल तर काय करावं?

वयाच्या तेविसाव्या वर्षीच दोघांनीही जॉब चालू केला आहे आणि PF मधून एकदाही पैसे काढले नाहीयेत. त्यामुळे, त्या दोघांनाही PF मधून खूप मोठा कॉर्पस मिळू शकतो. रिटायरमेंटसाठी आवश्यक असणाऱ्या कॉर्पसपैकी जवळपास 50% रक्कम PF मधूनच मिळेल, म्हणून दोघेही निश्चिंत होते. मात्र, पुढे 2 3 महिन्यानंतर त्यांनी PF चं पासबुक बघितलं तर त्यांना खूप मोठा धक्का बसला.

रोहन आणि मोहित रिटायरमेंट प्लॅनिंग संदर्भात चर्चा करत होते. वयाच्या साठाव्या वर्षी रिटायर झाल्यावर चांगलं आयुष्य जगण्यासाठी किती पैसे लागतील, याचं दोघांनीही कॅल्क्युलेशन केलं. रिटायर झाल्यावर PF म्हणजेच प्रोविडेंट फंडचे पैसे मिळतील, तसेच रोहन आणि मोहितने रिटायरमेंटसाठी नॅशनल पेन्शन स्कीम आणि म्युच्युअल फंड्समध्ये काही गुंतवणूक केली आहे. वयाच्या तेविसाव्या वर्षीच दोघांनीही जॉब चालू केला आहे आणि PF मधून एकदाही पैसे काढले नाहीयेत. त्यामुळे, त्या दोघांनाही PF मधून खूप मोठा कॉर्पस मिळू शकतो. रिटायरमेंटसाठी आवश्यक असणाऱ्या कॉर्पसपैकी जवळपास 50% रक्कम PF मधूनच मिळेल, म्हणून दोघेही निश्चिंत होते. मात्र, पुढे 2 3 महिन्यानंतर त्यांनी PF चं पासबुक बघितलं तर त्यांना खूप मोठा धक्का बसला.

रोहन आणि मोहितच्या कंपनीने मागच्या 6 महिन्यांपासून त्यांच्या PF अकॉउंटमध्ये पैसे जमा केले नाहीयेत. एका बाजूला रोहन आणि मोहितप्रमाणे आपल्यासारखे अनेक नोकरदार PF चे पैसे मिळणार म्हणून निश्चिन्त असतात. पण कंपनीने जर आपल्या PF अकॉउंटमध्ये पैसेच जमा केले नाही तर रिटायरमेंटच्या वेळेला आपल्याला फंड कसा मिळेल, हा सर्वात बेसिक प्रश्न आहे. टाटा, रिलायन्स, इन्फोसिससारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये हि अडचण येत नाही कारण त्यांचे अकाऊंट्स क्लिअर असतात, मात्र लहान कंपन्यांमध्ये किंवा स्टार्ट-अपमध्ये ही अडचण येऊ शकते.

आपण ज्या वेळेला कंपनीमध्ये जॉईन होतो, तेव्हा ऑफर लेटरमध्ये CTC म्हणजेच कॉस्ट टू कंपनीच्या स्वरूपात आपला एकूण पगार दिलेला असतो. त्यामध्ये, बेसिक सॅलरी, अलोव्हन्स, इन्सेन्टिव्ह आणि प्रोविडेंट फंड अश्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पगार विभागलेला असतो. बाकी सर्व पैसे आपल्याला थेट सॅलरी अकॉउंटमध्ये मिळतात, मात्र PF चे पैसे कंपनी आपल्या PF अकॉउंटमध्ये जमा करते. 20 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या प्रत्येक कंपनीला EPFO ​​मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 12% रक्कम त्याच्या किंवा तिच्या PF खात्यात जमा करणे आवश्यक आहे आणि कंपनी विविध शीर्षकांतर्गत समान रक्कम देखील योगदान देते. पीएफसाठी कपात केलेली रक्कम कर्मचाऱ्यांच्या EPFO ​​खात्यात जमा करणे ही कंपनीची जबाबदारी आहे. कंपनीने ऑफर लेटरमध्ये नमूद केलं आहे, म्हणजे ते पैसे आपल्याला PF अकॉउंटमध्ये जमा केले असतील, असा कर्मचाऱ्यांचा समज असतो. कामाच्या व्यापात आपलं त्याकडे लक्ष जात नाही. बरेच लोकं PF चं पासबुक चेक करत नाहीत. मात्र, आपण याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विशेषतः जर आपण एखाद्या लहान कंपनीमध्ये किंवा स्टार्ट अप मध्ये काम करत असू तर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी सगळ्यात आधी PF अकॉउंटला आपला मोबाईल नंबर आणि मेल ID रजिस्टर आहे का, ते चेक करा. तसेच, EPFO कडून पैसे जमा झाल्याचे मेसेज येत आहेत का, त्याकडे लक्ष द्या. PF बॅलन्स चेक करण्यासाठी अनेक अँप्स आहेत, त्यावर आपण कंपनीकडून जमा झालेले पैसे आणि त्यावर मिळालेलं व्याज याबद्दल सविस्तर माहिती मिळवू शकतो. जर सलग 2 किंवा 3 महिने EPFO कडून मेसेज आले नाही तर तात्काळ कंपनीच्या HR कडे चौकशी करा.

कंपनीने पुढच्या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या EPFO ​​मध्ये पैसे जमा करणे आवश्यक आहे. समजा जर सप्टेंबरचा पगार १ ऑक्टोबरला जमा झाला, तर पीएफसाठी कापलेली रक्कम १५ ऑक्टोबरपर्यंत जमा करावी लागेल. सुप्रीम कोर्टने फेब्रुवारी 2022 मध्ये दिलेल्या जजमेंटनुसार कंपनीने कर्मचाऱ्यांचा PF जमा करायला उशीर केला तर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायद्याच्या कलम 14B अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्यांना दंड भरावा लागेल. पीएफ कापल्यानंतर कंपन्या आपली जबाबदारी टाळू शकत नाहीत. रोहन आणि मोहितच्या बाबतीत, त्याच्या कंपनीने त्याच्या पगारातून PF चे पैसे तर कापले होते, पण ते EPFO कडे जमा केले नव्हते. अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. प्रसिद्ध स्टार्ट अप बायजूसच्या कर्मचाऱ्यांना देखील या अडचणींचा सामना करावा लागला. म्हणूनच, आपल्या PF चे पैसे खरंच आपल्या EPF खात्यात जमा केले जात आहेत का याची खात्री करणं आवश्यक आहे. यासाठी आपण EPFO पोर्टल किंवा उमंग अँपचा वापर करू शकतो. तिसरा आणि सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून EPFOHO (स्पेस) UAN नंबर टाइप करा आणि ७७३८२ ९९८९९ वर SMS पाठवा. तसेच, तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 9966044425 वर कॉल करू शकता.

जर कंपनी आपल्या पगारातून पैसे कपात असेल पण PF अकॉउंटमध्ये जमा करत नसेल, तर सगळ्यात आधी आपण HR कडे चौकशी केली पाहिजे. HR कडून व्यवस्थित माहिती नाही मिळाली तर मात्र आपल्याला कंपनी विरोधात तक्रार करावी लागेल. आपण या संदर्भात EPFIGMS पोर्टलवर तक्रार दाखल करू शकतो. तसेच, जवळच्या PF ऑफिसमध्ये जाऊन आपण कम्प्लेंट करू शकतो. एवढंच नाहीतर कंपनी आणि कंपनीच्या डायरेक्टरला नोटीस पाठवून पैसे जमा करण्यासाठी भाग पाडू शकता. रिटायरमेंटनंतर आपलं आयुष्य कसं असेल हे आपल्याला PF मधून मिळणाऱ्या रकमेवर अवलंबून आहे. त्यामुळे, आपल्याला PF कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. PF अकॉउंटमध्ये पैसे होत आहेत का, त्यावर व्याज मिळतंय का, हे आपण नियमित बघितलं पाहिजे. नियमित पासबुक नाही बघितलं तर नंतर पश्चताप करावा लागू शकतो.

Published: March 18, 2024, 18:39 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App