Cibil Report मध्ये निगेटिव्ह एंट्रीचा परिणाम किती दिवस टिकतो?

आपण पर्सनल लोन, होम लोन, कार लोन, किंवा अन्य कोणत्याही लोनसाठी अर्ज केला तर क्रेडिट रिपोर्ट आणि क्रेडिट स्कोअर बघितल्याशिवाय कोणतीही वित्तीय संस्था कर्ज मंजूर करत नाही. सगळ्यात आधी क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट रिपोर्ट म्हणजे काय, ते जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे.

क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट रिपोर्ट हे दोन्हीही आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. आपल्याला कोणत्याही प्रकारचं लोन घ्यायचं असेल, तर बँक सर्वात आधी क्रेडिट स्कोअर तपासते. कर्ज परतफेडीचा आपला ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे, हे बँक अधिकाऱ्यांना क्रेडिट रिपोर्टच्या माध्यमातून कळतं. आपण पर्सनल लोन, होम लोन, कार लोन, किंवा अन्य कोणत्याही लोनसाठी अर्ज केला तर क्रेडिट रिपोर्ट आणि क्रेडिट स्कोअर बघितल्याशिवाय कोणतीही वित्तीय संस्था कर्ज मंजूर करत नाही. सगळ्यात आधी क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट रिपोर्ट म्हणजे काय, ते जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. क्रेडिट रिपोर्टमध्ये आपण आत्तापर्यंत किती कर्ज घेतले त्याची सविस्तर माहिती असते. कोणत्या संस्थेकडून किती कर्ज घेतलं, कधी घेतलं, सध्या कोणतं कर्ज चालू आहे, कर्जाची परतफेड करताना EMI वेळेवर भरले आहेत का, किती वेळेला EMI बाउंस झाले या प्रकारची सगळी माहिती क्रेडिट मॅनेजरला एका क्लिकवर कळते. या सगळ्या पॅरामीटरचा विचार करून एक क्रेडिट स्कोअर बनवला जातो. हा 3 अंकी स्कोअर असतो, स्कोअर जेव्हडा जास्त असेल तेवढी कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते आणि अश्या ग्राहकांना वित्तीय संस्था कमी व्याजदरात कर्ज देतात.

कर्ज परतफेडीचा ट्रॅक रेकॉर्ड क्रेडिट रिपोर्टमधून कळतेच, पण या व्यतिरिक्त कर्जदाराने किती वेळेला आणि कोणत्या कर्जासाठी किंवा क्रेडिट कार्डसाठी एन्क्वायरी केली आहे, तसेच क्रेडिट कार्डचा किती वापर केला आहे याचीदेखील माहिती मिळते. या सगळ्या गोष्टींचा कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. TransUnion CIBIL, Equifax, Experian सारख्या संस्था क्रेडिट रिपोर्ट तयार करतात. यापैकी, बऱ्याच संस्था सिबिल रिपोर्टचा वापर करतात. सिबिल स्कोअर 300 ते 900 च्या दरम्यान असतो. क्रेडिट स्कोअर जेवढा जास्त असेल तेवढं चांगलं आहे. कर्जदाराचा परतफेडीचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असेल, त्याने क्रेडिट कार्डचा खूप जास्त वापर केला नसेल आणि एन्क्वायरी जास्त केल्या नसतील, तर सिबिल स्कोअर 800 ते 900 च्या दरम्यान असू शकतो. Equifax and Experian चा क्रेडिट स्कोअर 300 ते 850 च्या दरम्यान असतो. क्रेडिट स्कोअर 700 पेक्षा जास्त असेल तर बँका कर्ज द्यायला तयार होतात. 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असेल तर अश्या कर्जदारांना वित्तीय संस्था प्राधान्य देतात. अश्या ग्राहकांसाठी वित्तीय संस्था कमी व्याजदरात कर्ज देतात, तसेच प्रोसेसिंग फी आणि अन्य शुल्क कमी करून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जातो.

दुसऱ्या बाजूला कर्जदाराने वेळेवर कर्जाची परतफेड केली नसेल किंवा काही EMI बाउंस झाले असतील, तर त्याचा क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. EMI बाउंस झाल्यावर कर्जदाराने तात्काळ बँकेत जाऊन EMI भरला असेल तर कमी नकारात्मक परिणाम होतो. मात्र, कर्जदाराने सलग 6 महिने किंवा 12 महिने EMI भरले नाहीतर कर्जच NPA मध्ये रूपांतर होतं. अश्या कर्जदारांना नंतर कर्ज मिळवण्यात अडचणी येतात. या सगळ्याची क्रेडिट रिपोर्टमध्ये नोंद केली जाते. मात्र, या एंट्री किती काळ क्रेडिट स्कोअरमध्ये राहतात, ते जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. अश्या प्रकारच्या निगेटिव्ह एंट्री क्रेडिट रिपोर्टमध्ये साधारण 7 वर्ष राहतात. एंट्रीच्या प्रकारानुसार हा कालावधी कमी जास्त होऊ शकतो. उदारणार्थ, एखाद्या महिन्यात EMI वेळेवर भरला नाहीतर त्याची एंट्री सिबिल रिपोर्टमध्ये 7 वर्ष राहते. जर कर्जदाराने कर्जाची परतफेड केली नसेल आणि अकॉउंट NPA झालं असेल तर अश्या प्रकारची एंट्री क्रेडिट रिपोर्टमध्ये 10 वर्ष राहते. या व्यतिरिक्त, आपण एखाद्या वित्तीय संस्थेकडे लोन किंवा क्रेडिट कार्डसाठी एन्क्वायरी केली असेल तर त्याला हार्ड एन्क्वायरी असं म्हणतात. ही एन्क्वायरी क्रेडिट रिपोर्टमध्ये 2 वर्ष रिफ्लेक्ट होते. मात्र, क्रेडिट स्कोअरवर त्याचा परिणाम केवळ 1 वर्षासाठीच होतो. एखाद्या महिन्यात आपला EMI बाउंस झाला, पण आपण नंतर त्याची परतफेड केली तर सुरुवातीचे काही वर्ष त्याचा क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. मात्र, कालांतराने त्याचा परिणाम कमी होतो. कर्ज परतफेडीच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये सुधारणा झाली तर नंतर क्रेडिट स्कोअर वाढत जातो. तुम्ही सिबिलच्या वेबसाईटवर जाऊन तुमचा क्रेडिट रिपोर्ट बघू शकता. कोणत्या कारणांसाठी तुमचा क्रेडिट स्कोअर कमी झाला आहे, त्याचं एनेलीसीस करा. या रिपोर्टचं एनालिसिस करून कर्ज परतफेडीच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये सुधारणा केली तर आपला क्रेडिट स्कोअर वाढेल आणि आपल्याला कमी व्याजदरात कर्ज मिळू शकेल.

Published: April 4, 2024, 12:05 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App