भारतीय कुटुंबांचं सरासरी मासिक उत्पन्न किती आहे आणि भारतीय नागरिक सर्वाधिक खर्च कशासाठी करतात? यासारख्या महत्वाच्या प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला लवकरच मिळणार आहेत. मनी9 चं हे सर्वेक्षण लवकरच TV9 नेटवर्कच्या TV9 भारतवर्ष या हिंदी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
2022 मध्ये, मनी9 ने देशातला सर्वात मोठा पर्सनल फायनान्स सर्वे केला होता. आता या वर्षी मनी9 ने अधिक मोठा आणि व्यापक पर्सनल फायनान्स सर्वे केला आहे. सर्वेक्षणाची जबाबदारी आरटीआय इंटरनॅशनल या नामांकित संस्थेकडे सोपवण्यात आली होती. ही संस्था वर्ल्ड बँक आणि फेसबुकसारख्या मोठ्या संस्थांसाठी सर्वेक्षणाचं काम करते.
2023 या वर्षाला निरोप देण्याची वेळ आली आहे. जगभरात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. मात्र, या बदलांचा तुमच्या आयुष्यावर किती परिणाम झालाय ?गेल्या वर्षभरात भारतीयांच्या उत्पन्नात काही बदल झालाय की नाही ? कुटुंबातील कमावत्या व्यक्तींची संख्या वाढली की कमी झाली ?
भारतातील या पहिल्या सर्वेक्षणातून नागरिकांची आर्थिक परिस्थिती,आशा,अपेक्षांचा रिपोर्ट कार्ड सादर होणार आहे. सर्वेक्षणातून देशातील कोणत्या भागातील नागरिक कार खरेदीचं नियोजन करत आहेत याची माहिती मिळेल. गृहकर्जासाठी कोणत्या राज्यातील नागरिक आतूर आहेत. विमा, म्युच्युअल फंड,सोन्यात कुठं सर्वाधिक गुंतवणूक केली जाते. चला तर मग तुमची बोटं भारतीयांच्या नाडीवर ठेवा आणि त्यांच्या हृदयाचे ठोके ऐका. Money9 चे हे सर्वेक्षण लवकरच TV9 नेटवर्कच्या हिंदी चॅनल TV9 भारतवर्षवर प्रसारित केला जाणार आहे.
भारतीयांचे सरासरी मासिक उत्पन्न किती आहे ? आणि भारतीय कुटुंब कुठे खर्च करतात? कुटुंबात किती सदस्य आहेत? आणि किती कमाई होते ?तसेच एकट्या कमावत्या सदस्यावर कुटंबातील किती जण अवलंबून असतात यांची माहिती तुम्हाला आहे का ? जाणून घ्या