बँक तुमच्या तक्रारीची दखल घेते का ? php // echo get_authors();
?>
बँकेच्या ग्राहक सेवा सुविधांबाबत ग्राहक असमाधानी आहेत. बँकेच्या ऍपवर तुम्हाला इतर अनेक गोष्टी दिसतील मात्र ग्राहक सेवा नंबर दिसणार नाही. समजा एखाद्या वेळी नंबर दिसल्यास 1 दाबा,2 दाबा असं करत पंधरा ते 20 मिनिटानंतर ग्राहक सेवा विभागात नंबर जातो. त्यानंतरही ग्राहकाचं पुरेसं समाधान होत नाही. यामुळे बँकांचे ग्राहक त्रासलेले आहेत. झोमॅटो,स्विगी आणि इतर ईृ-कॉमर्स प्लेटफॉर्मवर कस्टमर केअरला कॉल केल्यानंतर काही मिनिटात प्रश्न सुटतो. मात्र, अंत्यत महत्वाच्या सेवा देणाऱ्या बँकेच्या कस्टमर केअरकडून प्रश्न सुटता सुटत नाही

कार सर्विसिंग, हॉटेल, असो की UBER, Ola सगळेच जण रेटिंग देण्यासाठी विनंती करतात. मात्र, बँकाचे महत्व प्रत्येकांच्या आयुष्यात मोठे आहे. तरीही कुणाकडूनही रेटिंगबाबत विचारणा होत नाही. कधी सरकारी बँकांचं नेटवर्क डाऊन असतं तर कधी ऍप काम करत नाही.
बँका ग्राहक सेवा सक्षम करण्याकडे विशेष असं लक्ष देत नाहीत. बँकांचा जोर हा नवीन ग्राहक घेण्यावरच असतो,अशी तक्रार आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एम.राजेश्वर राव यांनी नुकतंच व्यक्त केली . बँकांना सेवा क्षेत्रात असल्याचा अभिमान आहे. मात्र,दुर्देवानं ग्राहक सेवेकडे लक्ष देत नाहीत,असंही मत राव यांनी व्यक्त केलंय.
बँकेची तक्रार निवारण व्यवस्था सक्षम करण्याची गरज आहे. आरबीआयच्या गव्हर्नर यांनाही बँकांची ग्राहक सेवा सक्षम व्हावी असं वाटतं मात्र, बँकांकडे इच्छाशक्तीचा अभाव आहे.बँकांच्या तक्रार निवारण कक्षात सुधारणा करण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिटिंग करण्याची आवश्यकता आहे,असं मत बिजॉन मिश्रा यांनी व्यक्त केलंय.
बँक ऑम्डबसमनकडे तक्रार करा
बँकेच्या ग्राहक सेवेबाबत तुम्ही असमाधानी असताल तर बँकेत जाऊन तक्रार नोंदवा. बँकेनं एका महिन्याच्या आत तुमच्या तक्रारीचं निवारण न केल्यास बँक ऑम्डबसमन पोर्टल cms.rbi.org.in वर जाऊन तक्रार नोंदवा. तसेच तुम्हाला सोशल मीडियाचाही वापर करता येतो. तुमच्या तक्रारीबाबत बँकेला टॅग करा.
Published: January 9, 2024, 14:23 IST
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App