बऱ्याच दिवसांपासून निवेदिता एक नवीन क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करतेय. मात्र,अद्याप क्रेडिट कार्ड घेण्याचं धैर्य तिच्यात निर्माण होत नाही. कार्ड घेताना प्रत्येक वेळी क्रेडिट स्कोअर आणखी खराब होईल अशी भिती तिला वाटतेय.
कित्येक जणांकडे एकांहून अधिक क्रेडिट कार्ड आहेत. काही जणांकडे तर तीन ते चार कार्ड आहेत. निवेदिताचं म्हणणं गृहित धरल्यास जास्त क्रेडिट कार्ड असणाऱ्यांचं क्रेडिट स्कोअर खूप खराब असू शकतो? तर असं बिल्कूल नाही. निवेदिताचा विचार तथ्यावर आधारित नाही.क्रेडिट कार्डचा वापर योग्य तऱ्हेने करणं आवश्यक आहे. क्रेडिट कार्डचा वापर योग्य तऱ्हेने केल्यास दोन काय पाच जरी क्रेडिट कार्ड असेल तरीही क्रेडिट स्कोअर खराब होणार नाही,उलट चांगलाच होईल. क्रेडिट कार्डशी सबंधित अशा बऱ्याच कल्पोकल्पित कथा आहेत, ज्यामुळे अनेक जणांना क्रेडिट कार्डचा योग्यरित्या वापर करता येत नाही . काय आहेत क्रेडिट कार्डशी सबंधित अनेक मिथक आहेत ते पाहूयात.
एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यास क्रेडिट स्कोअर खराब होतो.
बँका मुळात Credit Utilisation’s Ratio म्हणजे CUR कडे लक्ष देतात. CUR म्हणजे तुमच्या क्रेडिट कार्डवरील मिळालेली लिमिट आणि तुम्ही केलेला वापराचा रेशिओ. तुम्ही या रेशिओपेक्षा जास्त क्रेडिट कार्डचा वापर कल्यास तुमची कर्ड घेण्याची क्षमता कमी होते. मात्र,तुमच्याकडे एकापेक्षा अधिक कार्ड असल्यास तुम्हाला विविध कार्डचा वापर करून खर्च करता येतो. त्यामुळे CUR ची मर्यादा कायम राहील. त्यामुळे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असणं फायद्याचंच आहे.
क्रेडिट कार्डचं बिल उशिरा का होईना मात्र एकदाच भरल्यास काही नुकसान होणार नाही.
अंतिम दिनाकांनंतर बिल भरल्यास क्रेडिट स्कोअर खराब होतो. शेवटच्या तारखेनंतर तूम्ही पूर्ण बिल भरलं असलं तरीही तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. तसेच उशिरा बिल भरताा तुम्हाला लेट फीस आणि व्याजही भरावं लागतं. मात्र,उशिरा बिल भरण्याची सवय कर्ज घेताना चांगली समजली जात नाही.
दर महिन्याला किमान बिलभरणा केल्यास नुकसान होणार नाही.
क्रेडिट कार्डशी संबंधित हा एक सर्वात मोठं मिथक आहे आणि अनेक जण दर महिन्याला मिनिमम ड्यू अमाउंट भरत असतात. मिनिमम ड्यू अमाउंट भरल्यास फक्त लेट फीसवर लागणारा दंड लागणार नाही. मात्र,उर्वरित रक्कमेवर व्याज वसुल केला जातो. तसेच ज्या दिवशी तुमचा व्यवहार झाला आहे त्या दिवसापासून सुरू होतो. मिनिमम अमाउंट भरत राहिल्यास क्रेडिट कार्डचं बिल खूप मोठ्या प्रमाणात वाढते.
क्रेडिट कार्डची लिमिट वाढल्या खर्चात वाढ होईल.
क्रेडिट कार्डची लिमिट वाढणं हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. क्रेडिट कार्डचा वापर अत्यंत जबाबदारीनं तुम्ही करत आहात,त्यामुळे तुम्ही बँकेचे एक चांगले ग्राहक आहात. तसेच जास्त क्रेडिट लिमिट असल्यास क्रेडिट युटिलायझेशन रेशिओ कमी ठेवण्यास तुम्हाला फायदा होतो.
वार्षिक शुल्क असणारे कार्ड महाग असतात.
वार्षिक शुल्क असणाऱ्या कार्डवर जास्त रिवार्ड पाईंट्स मिळतात. तसेच इतर ब्रँण्डससोबतही अशा क्रेडिट कार्डचं टाय-अप असल्यानं आपल्याला डिस्काउंट आणि इतर ऑफर मिळतात. तसेच विमानतळावर फ्री लाउंज एक्सेसही मिळतो. याशिवाय अनेक कार्डावर एका वर्षात निर्धारित खर्च केल्यास वार्षिक शुल्क माफ केले जाते.
क्रेडिट कार्ड बंद केल्यास आपला क्रेडिट स्कोअर चांगला होतो.
असं बिलकूल नाही. याऊलट क्रेडिट कार्ड रद्द केल्यास बँकेला तुमचा क्रेडिट एक्सेस करण्यास अडचणी येतात. त्यामुळे कर्ज मिळण्यात अडचणी येतात.
त्यामुळे क्रेडिट कार्डच्या कल्पोकल्पित कथांकडे लक्ष देऊ नका.एक क्रेडिट कार्ड असू दे की चार, क्रेडिट कार्डचा वापर योग्य रितीनं करणं आवश्यक आहे. क्रेडिट कार्डचा योग्य वापर केल्यास तुमचं आर्थिक आरोग्य चांगलं राहतं. फक्त क्रेडिट कार्डचा वापर अत्यंत शहाणपणानं करणं आवश्यक आहे.
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App