बँक ऑफ इंडियानं काही दिवसांपूर्वी एक विशेष बचत खाते योजना सुरू केलीय. ‘नारी शक्ती’ असे या योजनेचे नाव आहे. 18 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातल्या आणि स्वतः कमावत असलेल्या महिलांसाठी ‘नारी शक्ती’ बचत खातं सुरू करण्यात आले आहे. नारीशक्ती हे एक फक्त बचत खातं नाही तर नारीशक्तीमधून महिलांचं आर्थिक सक्षमीकरण साधलं जाणार आहे,अशी माहिती बँकेनं दिलीय. आता ‘नारी शक्ती’बचत खात्यातील विविध सुविधांवर एक नजर टाकूयात.
विमा संरक्षण : ‘नारी शक्ती’ बचत खात्यामध्ये महिलांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. या बचत खात्यात एक कोटी रुपयांपर्यंत सर्वसमावेसक असा अपघाती विम्याचे कवच मिलते.
आरोग्य विम्यावर सवलत :‘नारी शक्ती’ बचत खात्यात महिलांना आरोग्य विमा आणि वेलनेस प्रॉडक्टवर आकर्षक सवलत मिळत आहे. वाढत्या महागाईमुळे उपचारांचा खर्चिक होत आहेत. त्यामुळे आरोग्य विम्यामुळे उपचारांचा खर्चात बचत होते.. तसेच वेलनेस प्रॉडक्टमुळे तुमचे आरोग्य देखील उत्तम राहते.
कर्जाच्या व्याज दरात सवलत : ‘नारी शक्ती’ बचत खाते असणाऱ्या महिलांना किरकोळ कर्ज म्हणजे वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज , वाहन कर्जावर आकर्षक व्याजदरात कर्ज मिळत आहेत. त्यामुळे कमी व्याज दरावर महिलांना कर्ज मिळणार आहे.
कर्जावर शून्य प्रक्रिया शुल्क: कमी व्याज दरासोबतच नारीशक्ती बचत खातं असलेल्या महिलांना कर्जावर कोणतंही प्रक्रिया शुल्क द्यावं लागणार नाही. वैयक्तिक कर्ज घेताना कर्जाच्या रक्कमेच्या 0.5 ते अडीच टक्क्यांपर्यंत प्रक्रिया शुल्क आकारले जाते.
मोफत क्रेडिट कार्ड : ‘नारी शक्ती’ बचत खाते सुरू करणाऱ्या महिलांना मोफत क्रेडिट कार्ड सुविधेचा लाभ घेता येतो. यामुळे व्यवहार करणे सोपे जाईल आणि अकाऊंटमध्ये पैसे नसल्यास देखील व्यवहार करता येतील.
सवलतीत लॉकर : महिलांकडे सोने, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने असतात. दागिने घरात ठेवणे जोखमीचे असते. त्यामुळे बँक लॉकरची गरज पडते. या योजनेअंतर्गत डायमंड बचत खाते धारकाला लॉकर सुविधेवर आकर्षक सवलत मिळते, ही सुविधा प्लॅटिनम बचत खाते धारकांसाठी मोफत आहे.
‘नारी शक्ती’ बचत खात्यात अनेक सुविधा असल्यानं किती फायदेशीर आहे हे तुम्हाला समजलं असेलच. ‘नारी शक्ती’बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही बँकेत जाऊन सुरू करता येते. तसंच बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन देखील सहज खातं उघडता येतं.नारीशक्ती खातं उघडल्यानंतर प्रत्येक खात्यासाठी व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधी म्हणजेच CSR फंडासाठी दहा रुपये देण्यात येणार आहेत. या सीएसआर फंडाचा वापर महिलां आणि मुलींच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासासाठी होणार आहे.
Published: January 18, 2024, 12:06 IST
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App