मुंबईतल्या अभ्युदय बँकेचा कारभार प्रशासकाच्या हाती, ATM सह बँकेचे सर्वच व्यवहार सुरळित php // echo get_authors();
?>
बॅंकेच्या कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी एसबीआयचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकासोबतच आरबीआयकडून सल्लागारांची समिती देखील नियुक्त करण्यात आलेली आहे. प्रशासकांच्या मदतीसाठी असलेल्या सल्लागार समितीमध्ये स्टेट बँकेचे माजी महाव्यवस्थापक व्यंकटेश हेगडे, चार्टर्ड अकाउंटंट महेंद्र छाजेड आणि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले यांचा समावेश आहे.
तुमचं खातं अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (Abhyudaya Co-operative Bank Ltd) असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. आरबीआयनं बँकेचं संचालक मंडळ एका वर्षासाठी बरखास्त केलं आहे. या बँकेत अनेक मध्यमवर्गीय आणि गरिब लोकांची खाती आहेत. आरबीआयनं कारवाई केल्यानंतर खातेदारांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. संचालकांनी गुणवत्तेच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे आरबीआयनं कारवाई केलीय. आरबीआयनं कारवाई केली असली तरीही ग्राहकांनी घाबरून जाऊ नये . आरबीआयच्या कारवाईचा बँकेच्या दैनंदिन व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नाही.
बँकेचा कारभार प्रशासक पाहणार
बॅंकेच्या कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी एसबीआयचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकासोबतच आरबीआयकडून सल्लागारांची समिती देखील नियुक्त करण्यात आलेली आहे. प्रशासकांच्या मदतीसाठी असलेल्या सल्लागार समितीमध्ये स्टेट बँकेचे माजी महाव्यवस्थापक व्यंकटेश हेगडे, चार्टर्ड अकाउंटंट महेंद्र छाजेड आणि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले यांचा समावेश आहे.
ATM सह सर्व व्यवहार सुरळित राहणार
आरबीआयकडून बँकेवर कोणतेही व्यावसायिक निर्बंध घातलेले नाहीत. त्यामुळे बँकेचे व्यवहार सुरळीत राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासकामुळे बँकेच्या कामाकाजावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वेबसाईटनुसार, 31 मार्च 2020 पर्यंत, बँकेकडे 17.30 लाखांहून अधिक ठेवीदार आहेत आणि एकूण ठेवी रु. 10,838 कोटी आहेत. बँकेचे भांडवल पर्याप्तता गुणोत्तर 12.60 टक्के होते
राजकीय सूडबुद्धीनं अभ्युदय बँकेवर कारवाई ?
अभ्युदय बँकेवर राजकीय सुडबुद्धीतून कारवाई करण्यात आल्याची चर्चा ही रंगू लागली आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट अभ्युदय बँकेच्या संचालक मंडळावर आहेत. घनदाट यांचा मुलगा संदीप घनदाट अभ्युदय बँकेत अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. 2009 मध्ये परभणीतील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून सीताराम घनदाट अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. 2020 मध्ये सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. काही दिवसांपूर्वीच घनदाट यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती अशी माहिती आहे. घनदाट यांनी शिवसेनेची जवळीक साधल्यानं राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई केल्याची चर्चा आहे.
Published: November 25, 2023, 15:43 IST
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App