एक्स्पोर्ट करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये करा गुंतवणूक

भारताचं साधारण 120 बिलियन डॉलरचं ट्रेड डेफिसिट आहे. हेच ट्रेड डेफिसिट कमी करण्यासाठी मोदी सरकारने PLI स्कीम, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारतासारख्या योजना चालू केल्या आहेत. सरकार कोणाचंही आलं तरी एक्स्पोर्ट वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील, यात काहीच शंका नाही. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या संधीचा आपण कसा फायदा करून घ्यायचा, चला मग या थीमचा कोणत्या कंपन्यांना फायदा होईल, ते जाणून घेऊया.

सरकार कोणाचंही असलातरी काही धोरणं कधीच बदलत नाहीत. यापैकी एक धोरण आहे, ते म्हणजे देशाचे एक्स्पोर्ट वाढवून इम्पोर्ट कमी करण्याचं. आपण इतर देशांना एक्स्पोर्ट केलं, तर आपला GDP वाढतो, आपल्या लोकांना रोजगार मिळतो, आपल्याला परकीय चलन मिळतं आणि आपला रुपया इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत मजबूत होतो. तर दुसऱ्या बाजूला इम्पोर्ट वाढले तर आपल्या कंपन्यांचा व्यवसाय बुडतो, देशाचं परकीय चलन खर्च होतं आणि ट्रेड डेफिसिटमध्ये वाढ होते. म्हणूनच नरेंद्र मोदी सरकारने शक्य तितके एक्स्पोर्ट वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसं बघितलं तर 1991 साली तत्कालीन पंतप्रधान PV नरसिम्हराव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था खुली केली आणि देशाचे एक्स्पोर्ट वाढायला सुरुवात झाली. 1991 साली भारताचे एक्स्पोर्ट साधारण 23 बिलियन डॉलर होते. हा आकडा आता 778 बिलियन डॉलरच्या वर गेला आहे. तर आपल्या इम्पोर्टचा आकडा 900 बिलियन डॉलरच्या वर आहे. म्हणजे भारताचं साधारण 120 बिलियन डॉलरचं ट्रेड डेफिसिट आहे. हेच ट्रेड डेफिसिट कमी करण्यासाठी मोदी सरकारने PLI स्कीम, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारतासारख्या योजना चालू केल्या आहेत. सरकार कोणाचंही आलं तरी एक्स्पोर्ट वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील, यात काहीच शंका नाही. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या संधीचा आपण कसा फायदा करून घ्यायचा, चला मग या थीमचा कोणत्या कंपन्यांना फायदा होईल, ते जाणून घेऊया.

भारतातून IT सर्व्हिसेस खूप मोठ्या प्रमाणावर एक्स्पोर्ट होतात. अमेरिका, UK युरोप आणि इतर देशांच्या तुलनेत कमी पैशात इंजिनिअर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे, हे काम भारतात आउटसोर्स केलं जातं. DBS ग्रुपच्या रिपोर्टनुसार, आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारताच्या सॉफ्टवेअर सेक्टरने 320 बिलियन डॉलरचे एक्स्पोर्ट केले. मात्र, जागतिक पातळीवर सॉफ्टवेअर एक्सपोर्टस्मध्ये भारताचा सध्या केवळ 11% मार्केट शेअर आहे. सांगण्याचा हेतू असा आहे कि भारताची IT इंडस्ट्री सध्या मोठी आहे, पण याही पेक्षा अनेक पटींनी मोठी ती पुढच्या 10 20 30 वर्षात होऊ शकते. या थीमचा फायदा करून घ्यायचा असेल तर आपण IT फंडमध्ये SIP करू शकतो. तसेच, प्रत्येक घसरणीमध्ये इन्फोसिस, TCS, टाटा टेक्नॉलॉजीससारखे ब्ल्यूचिप शेअर्समध्ये आपण गुंतवणूक करू शकतो.

भारतातल्या top 5 एक्स्पोर्ट कंपन्यांचा विचार केला तर यामध्ये रिलायन्स, राजेश एक्सपोर्टस, टाटा मोटर्स, BPCL आणि सॅन फार्मा या कंपन्यांचा समावेश आहे. काही कारणास्तव मार्केटमध्ये पडझड झाली तर रिलायन्स, टाटा मोटर्स आणि सन फार्ममध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. या व्यतिरिक्त, डिक्सन टेक्नॉलॉजीस आणि अंबर एंटरप्रायजेस या 2 कंपन्या इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन सेगमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करतात. पूर्वी आपण स्मार्टफोन इम्पोर्ट करत होतो, मात्र आता स्मार्टफोन भारतातच मॅन्युफॅक्चर होतं आहेत. भारतात जमीन आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे, तसेच इलेक्ट्रॉनिक्सची भारतातच मोठ्या प्रमाणावर विक्री होते. त्याचा डिक्सन आणि अंबर एंटरप्रायजेससारख्या कंपन्यांना फायदा होतोय. मागच्या 10 वर्षात अंबर एंटरप्रायजेसचा व्यवसाय 7 पट तर डिक्सन टेक्नॉलॉजीसचा व्यवसाय तब्बल 30 पट वाढला आहे. येणाऱ्या काळात या कंपन्यांच्या उत्पन्नात अशीच वाढ होऊ शकते. मात्र, हे शेअर्स सध्या खूप ओव्हर वॅल्यूड आहेत. त्यामुळे, शेअर्समध्ये काही कारणास्तव 30 ते 40% पडझड झाली तर आपण व्हॅल्यू बाईन्ग करू शकतो.

Published: April 24, 2024, 16:35 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App