नितीन गडकरींमुळे या इन्फ्रा शेअरला होणार फायदा !

नुकत्याच सादर केलेल्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फ्रा सेक्टरसाठी 11 लाख 11 हजार कोटींची तरतूद केली आहे. म्हणजेच मागच्या 10 वर्षात इन्फ्रा बजेटमध्ये तब्बल 6 पट वाढ झाली आहे. पण याचा कोणत्या कंपन्यांना आणि शेअर्सला फायदा होईल, ते जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे.

काँग्रेसचं सरकार आलं कि भाजपचे लोक काँग्रेसवर टीका करतात, भाजपचं सरकार असेल तर काँग्रेस पार्टीचे लोकं भाजपवर टीका करतात. विरोधी पार्टीच्या लोकांनी एखाद्या मंत्र्यांचं कौतुक करणं, ही तशी फार दुर्मिळ गोष्ट आहे. राजकारणात असं खूप कमी वेळेला पाहायला मिळतं. मात्र, काही नेत्यांना हे भाग्य लाभतं, त्यासाठी काम ही तसं केलं पाहिजे. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात अशेच एक मंत्री आहेत, त्यांचं नावं आहे नितीन जयराम गडकरी. रस्ते वाहतूक आणि महामार्ग या विभागाचे मंत्री म्हणून त्यांनी 9 वर्षापेक्षा जास्त काम केलं आहे. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी हे मंत्रिमंडळ सांभाळणारे ते भारतातले पहिलेच मंत्री आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस-वे, भारतमाला परियोजना, दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे, दिल्ली अमृतसर कटरा एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्गासारख्या असंख्य प्रोजेक्टमागे गडकरींचं व्हिजन आहे. 2013 मध्ये भारतात एका दिवसात केवळ 3 किलो-मीटरचे हायवे बांधले जात होते, आता हा आकडा 37 किलोमीटरच्या वर गेला आहे. मात्र, कोणताही प्रोजेक्ट पूर्ण करायचा असेल तर 2 गोष्टी लागतात, पहिली गोष्ट म्हणजे तीव्र इच्छाशक्ती आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, पैसा. इच्छाशक्ती तर गडकरींकडे आहेच, पण भांडवल जमावण्याचं कौशल्यदेखील त्यांच्याकडे आहे. नितीन गडकरींची खासियत म्हणजे आपल्याकडे भरपूर पैसा आहे, असं ते नेहमी म्हणतात. आपल्याकडे पैशाची कमी नाहीये, असं ते अभिमानाने सांगतात. बजेटमध्ये आपल्या विभागासाठी जास्तीत जास्त निधी मंजूर करून घेण्यात त्यांना सातत्याने यश मिळालं आहे.

आर्थिक वर्ष 2014 15 च्या बजटमध्ये तत्कालीन अर्थमंत्री P चिदंबरम यांनी इन्फ्रा सेक्टरसाठी 1 लाख 81 हजार कोटींची तरतूद केली होती. मात्र, नरेंद्र मोदींच्या सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रयत्न चालू केले. देशाचा विकास करायचा असेल तर इन्फ्रा सेक्टरमध्ये गुंतवणूक वाढवली पाहिजे, हे मोदींना पहिल्या दिवसापासून माहित होतं. मात्र, केवळ तरतूद करून काही उपयोग नाही, कारण जुने प्रोजेक्ट पूर्ण झाले तरच नवीन प्रोजेक्टसाठी तरतूद करण्यात अर्थ आहे. नितीन गडकरींच्या मंत्रालयाने एक्सीक्युशनवर भर दिला आणि जुने प्रोजेक्ट पूर्ण करून नवीन प्रोजेक्टसाठी प्लँनिंग चालू केलं. एका बाजूला प्रोजेक्ट पूर्ण होतं होते, तर दुसऱ्या बाजूला सरकार बजेटमधून तरतूद वाढवत होतं. नुकत्याच सादर केलेल्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फ्रा सेक्टरसाठी 11 लाख 11 हजार कोटींची तरतूद केली आहे. म्हणजेच मागच्या 10 वर्षात इन्फ्रा बजेटमध्ये तब्बल 6 पट वाढ झाली आहे.

पण याचा कोणत्या कंपन्यांना आणि शेअर्सला फायदा होईल, ते जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. इन्फ्रा सेक्टरमध्ये रेल्वे, रोड, पोर्ट, हाऊसिंगचा समावेश आहे. या सेगमेंटमध्ये काम करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, मात्र आपण आज एका अश्या कंपनीची माहिती घेणार आहोत, ज्या कंपनीला प्रत्येक इन्फ्रा प्रोजेक्टचा फायदा होतो, ती कंपनी आहे मैथन ऍलोय्स. कोणताही इन्फ्रा प्रोजेक्ट पूर्ण करायचा असेल तर स्टीलशिवाय तो पूर्ण होऊ शकत नाही, स्टील बनवायचं असेल तर मँगॅनीज ऍलोय्सची गरज असते आणि मैथन ऍलोय्स ही कंपनी मँगॅनीज ऍलोय्स बनवणारी भारतातली सर्वात मोठी कंपनी आहे. मागच्या 10 वर्षात कंपनीचा नफा जवळपास 6 पट वाढला आहे. विशेष म्हणजे ही पूर्णपणे डेट फ्री कंपनी आहे. कंपनीकडे टाटा स्टील, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि जिंदाल स्टीलसारखे नामांकित ग्राहक आहेत. भारतात कोणताही इन्फ्रा प्रोजेक्ट पूर्ण झाला, कि त्यामध्ये लाखो टन स्टीलचा वापर होतो आणि अर्थातच त्याचा मैथन ऍलोय्सला फायदा होतो. विशेष म्हणजे, हा शेअर टेक्निकली सुद्धा अतिशय मजबूत आहे. या शेअरने 1000 रुपयाचा महत्वाचा रेसिस्टन्स पार केला असून, सध्या तो 1100 रुपयाच्या जवळ ट्रेड करतोय. पुढचे अनेक वर्ष भारताच्या इन्फ्रा सेक्टरमध्ये वाढ होणार आहे आणि त्याचा मैथन ऍलोय्सला नक्की फायदा होईल.

Published: February 5, 2024, 19:03 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App