कंपनीकडून HRA मिळत नसेल तर घरभाड्यात सवलत कशी मिळवाल ?

घरभाड्यामध्ये सवलत मिळवायची कशी ते जाणून घ्या.

  • Team Money9
  • Last Updated : December 7, 2023, 16:31 IST

बहुतांश कर्मचाऱ्यांच्या पगारात हाऊस रेंट अलाऊन्स हा एक उत्पन्नाचा एक भाग असतो. कर्मचाऱ्याच्या पगारात आणि CTC मध्ये HRA बद्दल नमूद केलेले असते.कंपनीकडून HRA मिळत असेल तरच भाड्याच्या रक्कमेवर कर वजावट करता येते.मात्र, आयकर कलम 80GG नुसार कंपनीकडून HRA मिळत नसला तरीही कर वजावटीसाठी दावा करता येतो.

80GG चा फायदा कुणाला ?
अनेक लहान कंपन्या कर्मचाऱ्यांना HRA देत नाहीत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना कलम 80GG अंतर्गत घराच्या भाड्यावर कर वजावटीचा लाभ मिळवण्यासाठी दावा करता येतो. तसेच स्वयं रोजगार करणारे किंवा फ्रीलान्सरला 80GG कलमाचा लाभ घेता येतो.

80GG चा फायदा कुणाला मिळत नाही ?

काही नियमांचे पालन केल्यानंतर 80GG अंतर्गत कर सवलतीचा दावा करता येतो. ज्या शहरात कर्मचारी काम करत आहे त्या शहरात त्याचे घर असू नये. तसेच त्याच्या पत्नीच्या किंवा अल्पवयीन मुलांच्या नावावरही घर असू नये. त्यासोबतच एखाद्या व्यक्तीचं ऑफिस असेल किंवा तो एखादा व्यवसाय करत असल्यास त्याला 80GG अंतर्गत लाभ घेता येतो. एखाद्या कर्मचाऱ्याचे घर नोकरीचं शहर सोडून इतर शहरात असलं तरीही ते स्वत:च्या नावावर नसावं. घर भाडे भत्ता म्हणजेच HRA प्रमाणेच 80GG अंतर्गत भाड्याच्या रक्मेवर कर वजावटीचा लाभ घेता येतो.

80GG अंतर्गत कर वजावटीचा लाभ घेण्याचा एक फॉर्म्युला आहे. कर वजावटीची रक्कम ठरवण्यासाठी तीन अटींचा आधार घेण्यात येतो. पहिली अट म्हणजे 5000 रुपये प्रति महिना म्हणजे वार्षिक 60 हजार रुपयांपर्यंतचं भाडं. तुम्ही देत असलंलं भाडं साठ हजारांपेक्षा जास्त असलं तरीही तुम्हाला साठ हजाराच्या मर्यादेपर्यंत कर सवलत मिळते. दुसरी अटीत एकूण उत्पन्नाच्या 25 टक्के भाडं. यात 80C सारखे डिडक्शनचा समावेश नसतो. तिसरी अट म्हणजे एकूण वार्षिक उत्पन्नातून दहा टक्के रक्कम कमी केल्यानंतर येणारी रक्कम. या तिन्ही पैकी कोणती रक्कम कमी असेल त्यावर डिडक्शनचा लाभ मिळतो.

हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूयात. समजा सुभाषचं वार्षिक उत्पन्न पंधरा लाख रुपये आहे. तो 80C सह इतर कलमाअंतर्गत दोन लाख रुपयांचा कर वजावटीसाठी दावा करतो.मग त्याचं एकूण उत्पन्न तेरा लाखांवर येणार. जर तो दर महिन्याला 12 हजार रुपयं आणि वर्षाला दोन लाख 40 हजार रुपयांचे भाडं असल्यास या तीन पैकी एका रक्कमेवर त्याला कर कपातीसाठी दावा करता येतो.

पहिली रक्कम दर महिन्याला पाच हजार भाडं याप्रमाणे वर्षभराचं भाडं 60 हजार रुपये. दुसरी रक्कम उत्पन्नाच्या 25 % म्हणजे 3 लाख 25 हजार रुपये. तिसरी रक्कम ही एकूण वार्षिक घर भाड्याच्या रकमेतून दहा टक्के वार्षिक उत्पन्न वजा करून आलेली रक्कम. म्हणजेच दोन लाख चाळीस हजार घर भाड्यातून एक लाख तीन हजार रुपये वजा केल्यास 1 लाख 10 हजार रुपयांची रक्कम येते. या तिन्ही रकमेपैकी 60 हजार रुपयांची रक्कम सर्वात कमी असल्यानं सुभाषला 80 GG अर्तगत साठ हजार रुपयांची कर सवलत मिळू शकते.

फॉर्म 10BA भरल्यानंतर कलम 80GG अंतर्गत भाड्यावरील कर वजावटीचा दावा करता येतो.  हा फॉर्म प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर ई-फाइल विभागात मिळतो. फॉर्म 10BA मध्ये भाड्याची रक्कम, कालावधी, घरमालकाचे नाव आणि पत्ता, इत्यादी तपशीलाची माहिती भरून घोषणापत्र सादर करावे लागते. घोषणापत्र मंजूर झाल्यानंतर विवरणपत्र भरताना कलम 80GG च्या पर्यायावर क्लिक करून दावा करा

सुभाषप्रमाणे, जर तुम्ही कलम 80GG अंतर्गत भाड्यावर कर सूट मिळवू शकत असाल तर कपातीची रक्कम तुमच्या उत्पन्नातून वजा केली जाईल आणि तुमचा कर कमी केला जाईल. कपातीचा दावा करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिली म्हणजे नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांना 80GG ची वजावट घेता येणार नाही. दुसरे HRA आणि 80GG या दोन्हींचा लाभ एकत्र घेता येणार नाही आणि तिसरे म्हणजे वार्षिक भाडे 1 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास घरमालकाचा पॅन क्रमांक द्यावा लागेल.

Published: December 7, 2023, 12:47 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App