विमान रद्द झाल्यानंतर रिफंड कसं मिळवाल?

काही दिवसांपूर्वी भारतात खराब हवामान आणि अन्य कारणांमुळे जवळपास 500 पेक्षा फ्लाईट रद्द झाल्या. बऱ्याच प्रवासाच्या कनेक्टिंग फ्लाईट असतात, काही लोकांच्या महत्वाच्या मीटिंग असतात, तर काही लोकं महत्वाच्या कार्यक्रमाला जात असतात. मात्र, अचानक फ्लाईट रद्द झाली किंवा लेट झाली तर लोकांचा पुढचा प्लॅन देखील बिघडतो. यामुळे, त्यांचं आर्थिक नुकसान तर होतंच, शिवाय त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. अश्या परिस्थितीत प्रवाशांकडे नागरी विमान वाह्तूक मंत्रालय म्हणजे एअरसेवाकडे तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

काही दिवसांपूर्वी राहुल दिल्ली एअरपोर्टवर बराच वेळ फ्लाईटची वाट पाहत होता. विमान नक्की कधी येणार आहे याबद्दल एअरलाईन काहीच माहिती देत नव्हती. सुरूवातीला हवामान खराब असल्यामुळे आपलं विमान दोन तास लेट होईल, असं त्याला सांगण्यात आलं. त्यानंतर, तब्बल पाच तासानंतर विमानाने टेक-ऑफ केला.
खराब हवामानामुळे फ्लाईट लेट झाली, त्याचा राहुलसोबतच आणखी 200 लोकांना फटका बसला. काही दिवसांपूर्वी भारतात खराब हवामान आणि अन्य कारणांमुळे जवळपास 500 पेक्षा फ्लाईट रद्द झाल्या. बऱ्याच प्रवासाच्या कनेक्टिंग फ्लाईट असतात, काही लोकांच्या महत्वाच्या मीटिंग असतात, तर काही लोकं महत्वाच्या कार्यक्रमाला जात असतात. मात्र, अचानक फ्लाईट रद्द झाली किंवा लेट झाली तर लोकांचा पुढचा प्लॅन देखील बिघडतो. यामुळे, त्यांचं आर्थिक नुकसान तर होतंच, शिवाय त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.अश्या परिस्थितीत प्रवाशांकडे नागरी विमान वाह्तूक मंत्रालय म्हणजे एअरसेवाकडे तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

फ्लाईट लेट झाली किंवा कॅन्सल झाली तर प्रवासी एअर सेवा ऍपवर तक्रार करू शकतात, याच अँपच्या माध्यमातून ते रिफंडदेखील क्लेम करू शकतात. याशिवाय या ऍपवर विमानाच्या उड्डाणाची वेळ, विमानांचं बुकिंग, विमानाच्या ठिकाणाची माहितीही मिळते. हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांमध्ये एअर सेवा अॅप सध्या उपलब्ध आहे. एअरसेवा अॅपचा वापर करणं अतिशय सोपं आहे. एअरसेवा अॅप स्टोअर किंवा प्ले स्टोअर वर डाउनलोड करता येतं. यामध्ये तुमचे सर्व तपशील भरुन होमपेज वर उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पर्यायामधून Grievance Redressal चा पर्याय निवडा, या ठिकाणी तुम्हाला विविध कंपन्या निवडण्याचा पर्याय मिळेल. पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती भरावी लागेल. उदाहरणार्थ तिकीटची माहिती, फ्लाईटसाठी तिकीट किती होतं अशी माहिती भरल्यानंतर तुम्ही रिफंडचा पर्याय निवडू शकता. त्यानंतर फ्लाईट रद्द होण्याचं किंवा उशिरा उड्डाण करण्यामागचं कारण लिहा. अश्या प्रकारे तुम्ही विमान कंपनीच्या विरोधात तक्रार करू शकता.

विमान रद्द झाल्यानंतर तुम्ही airsewa अॅप किंवा http://airsewa. gov. in/ ……..वेबसाइटचा वापर करुन रिफंड मिळवू शकता. अॅपमध्ये विमान रद्द होण्याची तक्रार दाखल करा. अॅपमार्फत तुमची तक्रार संबंधित विमान कंपन्यांना पाठवली जाते आणि ते रिफंड मिळवून देण्यासाठी आपली मदत करतात. AirSewa ॲप विमान प्रवासाशी संबंधित अनेक तक्रारी म्हणजे फ्लाइट लेट झाली, सामान हरवलं किंवा सामनाच नुकसान झालं, सीट मिळालं नाही, कंपनीने फ्लाईटचं शेड्युल बदललं, अश्या प्रकारची तक्रार करू शकता.. अश्या प्रकारे फ्लाईट लेट झालं किंवा कॅन्सल झालं तर शांत न बसता, एअर सेवा अँपच्या माध्यमातून तुमची तक्रार पोहोचवा. यामुळे, तुमचं आर्थिक नुकसान कमी करता येईल.

Published: February 13, 2024, 19:43 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App