कोणतं लाइफटाइम क्रेडिट कार्ड चांगलं आहे?

लाइफटाईम फ्री क्रेडिट कार्ड हे सर्वात लोकप्रिय क्रेडिट कार्ड आहेत... कारण यात कोणतीही वार्षिक फी द्यावी लागत नाही... हे कार्ड लाइफटाइम फ्री तर आहेतच शिवाय याचा वापर करून खर्च केला तर आकर्षक रिवॉर्ड पॉईंटदेखील मिळतात. या कॅटेगरीमध्ये कोणते कार्ड चांगले आहेत ते आता जाणून घेऊया.

श्रीनिवासकडे क्रेडिट कार्ड नाहीये, पन त्याला आता नवीन कार्ड घ्यायचं आहे. मात्र, मार्केटमध्ये अनेक प्रकारचे क्रेडिट कार्ड आहेत. त्यातच बऱ्याच क्रेडिट कार्डसाठी जॉईंग फी आणि एन्युअल फी भरावी लागते. बऱ्याच क्रेडिट कार्ड कंपन्या एन्युअल फी माफ करतात मात्र त्यासाठी त्यांची काही रक्कम खर्च करण्याची अट असते. उदारणार्थ, आपण क्रेडिट कार्डवर एका वर्षात किमान 1 लाख रुपये खर्च केले तर आपली वार्षिक फी माफ होते. तर काही कंपन्या केवळ पहिल्या वर्षासाठी एन्युअल फी आफ करतात. प्रत्येक क्रेडिट कार्डचे जॉइनिंग फी, एन्युअल फी, रिवॉर्ड आणि इतर गोष्टींसाठी वेगवेगळे नियम असतात. हे सगळे प्रकार ऐकून श्रीनिवासच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. श्रीनिवास तु लाइफटाइम फ्री असणारं क्रेडिट कार्ड खरेदी कर, असं श्रीनिवासचा मित्र त्याला सांगतो. लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या नियम आणि अटी असतात आणि कोणतं लाइफटाइम क्रेडिट कार्ड चांगलं आहे, असे अनेक प्रश्न श्रीनिवासच्या मनात आहेत. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.

लाइफटाईम फ्री क्रेडिट कार्ड हे सर्वात लोकप्रिय क्रेडिट कार्ड आहेत… कारण यात कोणतीही वार्षिक फी द्यावी लागत नाही… हे कार्ड लाइफटाइम फ्री तर आहेतच शिवाय याचा वापर करून खर्च केला तर आकर्षक रिवॉर्ड पॉईंटदेखील मिळतात. या कॅटेगरीमध्ये कोणते कार्ड चांगले आहेत ते आता जाणून घेऊया. सगळ्यात आधी Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्डबद्दल माहिती जाणून घेऊया. या कार्डवर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉईंटसाठी कोणतीही मर्यादा नाहीये, तसेच रिवॉर्ड पॉईंट वापरण्यासाठी कोणतीही एक्सपायरी डेट नाहीये. तसेच, तुमच्याकडे ऍमेझॉनची प्राईम मेंबरशिप असेल तर ऍमेझॉनच्या इ-कॉमर्स साईटवर केलेल्या प्रत्येक खरेदीवर 5% कॅशबॅक मिळेल. नॉन-प्राईम मेंबर्सला 3% कॅशबॅक मिळतो. Amazon Pay चा वापर करून कार्ड पेमेंट केलं तर तुम्हाला 2% कॅशबॅक मिळतो. मिळणार प्रत्येक 1 रिवॉर्ड पॉईंटची व्हॅल्यू 1 रुपया असते. आता, ICICI प्लॅटिनम चिप क्रेडिट कार्डबद्दल माहिती जाणून घेऊया… या कार्डवर, ग्राहकांना इंधन खर्च वगळता सर्व किरकोळ खरेदीवर खर्च केलेल्या प्रत्येक 100 रुपयांसाठी 2 रिवॉर्ड पॉइंट मिळतात. तसेच, HPCL पेट्रोल पंपांवर ICICI मर्चंट सर्व्हिसेस स्वाइप मशीन वापरलं तर 1% फ्युएल सरचार्ज माफ होऊ शकतो.

आता ॲक्सिस बँक माय झोन क्रेडिट कार्डबद्दल माहिती जाणून घेऊया. या कार्डची खासियत म्हणजे तुम्हाला ऑनलाइन खरेदीवर महिन्यातून दोनदा 120 रुपयांपर्यंत सूट मिळते, यासाठी तुम्हाला किमान 500 रुपये खर्च करावे लागतात. तसेच, प्रत्येक खरेदीवर आकर्षक रिवॉर्ड पॉइंट देखील मिळतात. पुढचं महत्वाचं कार्ड आहे कॅनरा बँक क्लासिक व्हिसा इंडिविद्युल क्रेडिट कार्ड आहे. या कार्डवर ग्राहकांना परतफेडीसाठी 50 दिवसांचा व्याजमुक्त कालावधी मिळतो, तसेच ऑनलाईन शॉपिंगवर डिस्कॉउंटदेखील मिळतो. या कार्डचा वापर परदेशात देखील करता येतो. या व्यतिरिक्त, अनेक लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्डचे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. यामध्ये शॉपर्स स्टॉप HDFC बँक क्रेडिट कार्ड, कोटक महिंद्रा बँक फॉर्च्यून गोल्ड कार्ड, IDFC फर्स्ट क्लासिक क्रेडिट कार्ड, IDFC फर्स्ट सिलेक्ट क्रेडिट कार्ड, बँक ऑफ बडोदा इझी क्रेडिट कार्ड, येस प्रोस्पेरिटी पर्चेस क्रेडिट कार्ड, स्टँडर्ड चार्टर्ड प्लॅटिनम रिवॉर्ड्स क्रेडिट कार्ड, AU LIT क्रेडिट कार्ड आणि HSBC व्हिसा प्लॅटिनम क्रेडिट कार्ड या कार्ड्सचा समावेश आहे. हे कार्ड लाइफटाइम फ्री आहेत, मात्र यामुळे ग्राहकांना एअरपोर्ट लॉन्ज एंट्री, एअर माइल्स, लक्जरी मेंबरशिप यासारख्या काही सुविधा मिळत नाहीत. मात्र, ज्यांना बेसिक खर्चासाठी क्रेडिट कार्डचा वापर करायचा आहे, त्यांच्यासाठी लाइफटाइम क्रेडिट कार्ड हा नक्कीच चांगला पर्याय आहे.

Published: February 28, 2024, 19:26 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App