15 मार्चपर्यंत देशात साखरेचे 280 लाख टन उत्पादन php // echo get_authors();
?>
यंदाच्या गळित हंगामात पंधरा मार्चपर्यंत भारतातील निव्वळ साखर उत्पादनात तुरळक घट होऊन साखरेचे उत्पादन हे 280 लाख 79 हजार टन झाले आहे,अशी माहिती साखर कारखानदारांची संघटना असलेल्या 'इस्मा'नं दिलीय. गेल्या वर्षी याच कालावधीत 282 लाख 60 हजार टन साखरेचे उत्पादन झाले होतं.
महाराष्ट्रात आतापर्यंत 100.50 लाख टन साखरेचे उत्पादन
देशात 371 कारखान्यात उसाचे गाळप सुरू
यंदाच्या गळित हंगामात पंधरा मार्चपर्यंत भारतातील निव्वळ साखर उत्पादनात तुरळक घट होऊन साखरेचे उत्पादन हे 280 लाख 79 हजार टन झाले आहे,अशी माहिती साखर कारखानदारांची संघटना असलेल्या ‘इस्मा’नं दिलीय. गेल्या वर्षी याच कालावधीत 282 लाख 60 हजार टन साखरेचे उत्पादन झाले होतं.
महाराष्ट्रात आतापर्यंत 100.50 लाख टन साखरेचे उत्पादन
महाराष्ट्रात यंदाच्या गळित हंगामात शंभर लाख पन्नास हजार टन साखरेचे उत्पादन झालंय. तर गेल्यावर्षी 101 लाख 92 हजार टन साखरेचे उत्पादन झालं होतं. तर कर्नाटकात साखरेच्या उत्पादनात घट होऊन साखरेचे उत्पादन साडे त्रैपन्न लाख टनांवरून 47.55 टनावर आलंय उत्तर प्रदेशात साखरेचं उत्पादन हे 88.40 लाख टन झालंय. या गळित हंगामात सुमारे 17 लाख टन उसाचा रस आणि बी हेव्ही मोलॅसिसपासून इथेनॉल करण्यास परवानगी दिल्यानंतर इस्मानं 323 लाख टन साखरेचं उत्पादन होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.15 मार्चपर्यंत सध्या 371 कारखान्यात उसाचे गाळप सुरू आहे, गेल्यावर्षी याच कालावधीत 325 कारखान्यात गाळप सुरू होते.
2022-23 या गळित हंगामात 328.2 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तर 38 लाख टन उसाचा रस आणि बी-हेवी मोलॉसिसचा वापर इथेनॉल करण्यासाठी आला होता. गेल्या आठवड्यात इस्मानं साखर उत्पादनाच्या अंदाजात सुधारणी केली होती. या अंदाजनुसार साखरेचं उत्पादन 9.5 लाख टनांनी वाढून 340 लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवलला आहे. गेल्या गळित हंगामात 366.2 लाख टन साखरेचं उत्पादन झाले होते.
तर जानेवारी महिन्यात ‘इस्मा’ने इथेनॉल निर्मितीकडे उसाचा रस न वळवल्यास 330.5 लाख टन साखरेचे उत्पादन होईल,असा अंदाज व्यक्त केला होता.
गेल्या महिन्यात केंद्र सरकारने 2024-25 या गळित हंगामासाठी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात म्हणजेच ‘एफआरपी’मध्ये 25 रुपयांनी वाढ करत 340 रुपये प्रति क्विंटल केली होती. आता ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणाऱ्या नव्या गळित हंगाात कारखान्यांना शेतकऱ्यांना नव्या एफआरपीप्रमाणे उसाला दर द्यावा लागणार आहे.
Published: March 19, 2024, 14:43 IST
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App