जागतिक व्यापार संघटनेत भारताची आक्रमक भूमिका, थायलंडने राजदूताला माघारी बोलावले php // echo get_authors();
?>
जागतिक व्यापार संघटनेच्या चर्चेत भारतावर आरोप करणे थायलंडच्या राजदूताला चांगलंच महागात पडलंय. चर्चे दरम्यान भारतावर टीका केल्यानंतर थायलंडच्या सरकारनं तातडीने पिम्चानोक वोंकॉर्पॉन पिटफील्डला तातडीने माघारी बोलावले आहे.
कृषी विषयक चर्चेदरम्यान थायलंडचे राजदूत पिटफील्ड यांनी भारतावर आरोप केले होते. भारत सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या नावानं स्वस्तात धान्य खरेदी करून त्या धान्याची निर्यात करतो,अशी खरेदी जागतिक व्यापाराच्या नियमाचा भंग करणारी आहे.असा आरोप पिटफील्ड यांनी केला होता. भारताने या आरोपाचे खंडन केले होते.

पिटफील्ड यांच्या आरोपानंतर भारताने बहिष्कार अस्त्राचा वापर करत थायलंड देशाचा प्रतिनिधी उपस्थित असलेल्या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय भारताने आक्रमक पवित्रा घेतला होता. भारताच्या या आक्रमक पवित्र्यानंतर थायलंडने त्यांच्या राजदूताला जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीतून माघारी बोलावले.
कृषी अनुदान आणि अन्न सुरक्षेच्या अनुदानावर जागतिक व्यापार संघटनेत दोन गट पडले आहेत. पिटफील्ड यांच्या वक्तव्याचे समर्थन अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाने केले आहे. हे सर्व देश भारताच्या कृषी विषयक प्रस्तावाचा विरोध करत आहेत.
अन्नसुरक्षेसाठी कृषी अनुदान निश्चित करण्यासाठीचे नियम बदलावेत आणि आधार वर्ष आणि मूल्यांकनासाठी नवीन सूत्र लागू करावे, अशी भारताची मागणी आहे. या प्रश्नावर कायमस्वरूपती तोडगा काढावा त्यामुळे विकसनशील देश त्यांच्या शेतकऱ्यांना मदत करू शकतील.कृषी आणि अन्न सुरक्षा अनुदानाबाबत विकसित देशांमध्ये एकमत नाही.त्यामुळे या मुद्यावर जागतिक व्यापार संघटनेत एकमत होण्याची शक्यता नाही.
Published: March 1, 2024, 15:07 IST
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App