Retirement Planning साठी फॉर्म्युला 777 चा वापर करा

एका बाजूला माहिती उपलब्ध आहे, तर दुसऱ्या बाजूला आता मुलांना सुरुवातीलाच चांगलं पॅकेज मिळतं. IT मध्ये फ्रेशर्सला 3 ते 6 लाखाचं मिळतं, इतर नोकऱ्यांचा विचार केला तर मुलांना साधारण 15 ते 18 हजार रुपयाचा पगार मिळतो. बऱ्याच मुलांच्या आई वडिलांनी घर खरेदी केलेलं असतं. त्यामुळे, घर खरेदी करण्याचं मोठं टेन्शन मुलांना नसतं जवाबदारी कमी असल्यामुळे मुलं आता पहिल्या पगारापासूनचं गुंतवणूक चालू करतात. अश्या तरुणांसाठी रिटायरमेंट प्लॅनिंगचा फॉर्म्युला नंबर ट्रिपल 7 आपण आज जाणून घेणार आहोत.

टेक्नॉलॉजीमुळे आपल्या आयुष्यावर अनेक प्रकारे चांगले वाईट परिणाम झाले आहेत. चांगल्या परिणामांचा विचार करायचा झाल्यास, युट्युब, फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या अँप्समुळे लोकांपर्यंत सगळी माहिती अगदी काही सेकंदात पोहोचते. पूर्वी माहितीअभावी गुंतवणूकदार उशिरा गुंतवणूक चालू करायचे. तसेच, त्यांना फायनान्शिअल प्लॅनिंगसाठी केवळ आर्थिक सल्लागारावरच अवलंबून राहावं लागायचं. सल्लागार खरी माहिती सांगतोय का नाही, ते गुंतवणूकदारांना कळायचं नाही. त्यामुळे, त्यांच्यावर विश्वास ठेऊनच गुंतवणूक करावी लागत होती. मात्र, आता एका क्लिकवर माहिती उपलब्ध आहे. आर्थिक सल्लागार जो सल्ला देतोय तो योग्य आहे याची खात्री आपण युट्युबसारख्या प्लॅटफॉर्म वरून सहज करू शकतो. एका बाजूला माहिती उपलब्ध आहे, तर दुसऱ्या बाजूला आता मुलांना सुरुवातीलाच चांगलं पॅकेज मिळतं. IT मध्ये फ्रेशर्सला 3 ते 6 लाखाचं मिळतं, इतर नोकऱ्यांचा विचार केला तर मुलांना साधारण 15 ते 18 हजार रुपयाचा पगार मिळतो. बऱ्याच मुलांच्या आई वडिलांनी घर खरेदी केलेलं असतं. त्यामुळे, घर खरेदी करण्याचं मोठं टेन्शन मुलांना नसतं जवाबदारी कमी असल्यामुळे मुलं आता पहिल्या पगारापासूनचं गुंतवणूक चालू करतात. अश्या तरुणांसाठी रिटायरमेंट प्लॅनिंगचा फॉर्म्युला नंबर ट्रिपल 7 आपण आज जाणून घेणार आहोत.

ज्या मुलांचं वय 30 पेक्षा कमी आहे, त्यांच्याकडे रिटायरमेंटसाठी 30 वर्षाचा कालावधी असतो. त्यामुळे, असे गुंतवणूकदार जास्त जोखीम घेऊन इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकतात. म्युच्युअल फंड्स किंवा नॅशनल पेन्शन स्कीमच्या माध्यमातून तरुण गुंतवणूकदारांनी SIP केली तर ते चांगला रिटायरमेंट कॉर्पस तयार करू शकतात. आता फॉर्म्युला ट्रिपल 7 म्हणजे काय ते जाणून घेऊया. रिटायरमेंट प्लॅनिंग करताना आपण सहसा साठाव्या वर्षाचाच विचार करतो. मात्र, 60 नंतर आपली तब्बेत साथ देईल का नाही ते सांगता येत नाही. त्यामुळे, आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर वयाच्या पन्नासाव्या वर्षी आपल्याकडे अर्ली रिटायरमेंटचा पर्याय पाहिजे. वयाच्या पन्नासाव्या वर्षी आपल्याकडे रिटायर होण्याचा पर्याय असेल तर पुढचं आयुष्य आणखी चांगल्या पद्धतीने घालवता येईल. यासाठी 30 पेक्षा कमी वय असणाऱ्या तरुण गुंतवणूकदारांनी दर महिन्याला 7000 रुपयाची गुंतवणूक 7 वेगवेगळ्या फंड्समध्ये 20 वर्षांसाठी केली तर पन्नासाव्या वर्षी त्यांना किती रक्कम मिळेल ते जाणून घेऊया. या गुंतवणुकीवर वार्षिक 12% CAGR रिटर्न मिळाला तर पन्नासाव्या वर्षी त्यांना 64 लाख रुपयाचा कॉर्पस मिळेल. मात्र, गुंतवणूकदारांनी SIP च्या रकमेत दर वर्षी 7 टक्याची वाढ केली तर हा आकडा 1 कोटी 3 लाखाच्या वर जाईल. हेच पैसे पुढच्या 10 वर्षासाठी पेन्शन म्हणून वापरली तर गुंतवणूकदाराला दर महिन्याला साधारण दीड लाख रुपये पेन्शन मिळेल. या पैशाचा वापर फिरण्यासाठी किंवा आयुष्याचा उपभोग घेण्यासाठी गुंतवणूकदार करू शकतो.

याच बरोबर गुंतवणूकदाराने आणखी 7000 रुपयाची SIP 30 वर्षासाठी चालू केली आणि दर वर्षी यामध्ये 7 टक्याची वाढ केली आणि वार्षिक 12% रिटर्न मिळाला तर वयाच्या साठाव्या वर्षी 4 कोटींचा कॉर्पस जमा होईल. या कॉर्पसचा पेन्शन फंड म्हणून वापर केला तर गुंतवणूकदारांना साठाव्या वर्षानंतर पुन्हा दर महिन्याला दीड लाखाची पेन्शन मिळू शकते. अश्या प्रकारे तरुणांनी वय कमी असताना फॉर्म्युला ट्रिपल 7 चा वापर करून रिटायरमेंट प्लॅनिंग केलं तर वयाच्या पन्नासाव्या वर्षी लवकर रिटायर होता येईल.

Published: April 15, 2024, 17:18 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App