50 30 20 Rule | पगाराच्या किती टक्के रक्कम बचतीसाठी वापरावी?

रॉबिनने जी चूक केली तीच चूक अनेक लोकं करतात. आपण गुंतवणूक करतोय याच समाधान मिळावं म्हणून आपण काही नॉमिनल रक्कम गुंतवत असतो. मात्र, असं करून आपण स्वतःची फसवणूक तर करत नाही आहोत ना, याचा विचार होणं गरजेचं आहे. 50 30 20 फॉर्म्युल्याचा वापर करून आपण गुंतवणुकीची रक्कम ठरवू शकतो.

रॉबिनने पुण्यातल्या एका नामांकित कॉलेजमधून MBA पूर्ण केलं. त्याला खराडीच्या एका नामांकित मल्टी-नॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळाली. फ्रेशर असूनही कंपनीने त्याला 7 लाख रुपयाचं पॅकेज दिलं. PF आणि इतर गोष्टींची कपात झाल्यावर त्याला साधारण 50000 रुपयाची इन-हॅन्ड सॅलरी मिळणार आहे. रॉबिन तू पहिल्या पगारापासूनच गुंतवणूक चालू कर असा सल्ला त्याच्या वडिलांनी त्याला दिला. त्यांचं म्हणणं रॉबिनने लगेच ऐकलं आणि दर महिन्याला 5000 रुपयाची गुंतवणूक चालू केली. पण ही गुंतवणूक योग्य आहे का? कोणत्या ऍसेटमध्ये गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळेल, यासाठी आपण बराच रिसर्च करतो. मात्र, किती गुंतवणूक करणं गरजेचं आहे, याकडे सोईस्कर दुर्लक्ष करतो. फ्युचर व्हॅल्यूचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे फ्युचर व्हॅल्यू इज इक्वल टू पेमेंट मल्टिप्लाइड बाय (1 + r)^n यामध्ये पेमेंट म्हणजे आपण केलेली गुंतवणूक, r म्हणजे रिटर्न आणि n म्हणजे गुंतवणुकीचा कालावधी. आपण केवळ R कडे लक्ष देतो मात्र पेमेंटकडे म्हणजेच गुंतवणुकीच्या रक्मेकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. आपल्याला भविष्यात जी रक्कम मिळणार आहे, ती रिटर्न इतकीच आपल्या गुंतवणुकीच्या रकमेवर आणि कालावधीवर देखील तितकीच अवलंबून आहे. त्यामुळे, रॉबिनने पगाराच्या किती टक्के रक्कम बचत केली पाहिजे, यासाठी काही फॉर्म्युला आहे ते आता जाणून घेऊया.

रॉबिनने जी चूक केली तीच चूक अनेक लोकं करतात. आपण गुंतवणूक करतोय याच समाधान मिळावं म्हणून आपण काही नॉमिनल रक्कम गुंतवत असतो. मात्र, असं करून आपण स्वतःची फसवणूक तर करत नाही आहोत ना, याचा विचार होणं गरजेचं आहे. 50 30 20 फॉर्म्युल्याचा वापर करून आपण गुंतवणुकीची रक्कम ठरवू शकतो. या फॉर्म्युल्यानुसार, आपण 50% पगार दैनंदिन गरजांसाठी वापरू शकतो. 30% पगार आपण इतर इच्छा किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी वापरू शकतो. उदारणार्थ रॉबिनला पुढच्या काही वर्षात घर आणि कार खरेदी करायची आहे. या 30% पगारातून तो यासाठी भांडवल जमा करू शकतो. उर्वरित 20% रक्कम मात्र दीर्घकालाईन गुंतवणुकीसाठी वापरली पाहिजे. ही 20% रक्कम रिटायरमेंट किंवा मुलांचं शिक्षण यासारख्या दीर्घकालीन उद्धिष्टांसाठी वापरली पाहिजे. रॉबिनचा पगार आहे 50000 रुपये, यापैकी किमान 20% रक्कम त्याने लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी वापरली पाहिजे. रॉबिनचं वय सध्या 25 आहे, त्याने जर म्युच्युअल फंड, ULIP किंवा नॅशनल पेन्शन स्कीमसारख्या योजनांच्या माध्यमातून इक्विटीमध्ये गुंतवणूक केली आणि त्याला 12% वार्षिक रिटर्न मिळाला तर त्याला साडे 5 कोटींचा रिटायरमेंट फंड मिळेल. ही रक्कम आटा मोठी वाटत असली तरी 35 वर्षानंतर या कॉर्पसची व्हॅल्यू सध्याच्या व्हॅल्यूपेक्षा कमी असेल. रिटायरमेंटसाठी प्रत्येकाने तरतूद केलीच पाहिजे कारण रिटायरमेंट ही एकच गोष्ट अशी आहे ज्यासाठी कोणतीही वित्तीय संस्था लोन देत नाही.

ही 20% केवळ लॉन्ग टर्मसाठीची गुंतवणूक आहे. रॉबिनला पुढच्या 3 वर्षात घर खरेदी करायचं आहे. त्यासाठी त्याला डाउनपेमेंट जमा करावं लागेल. त्याची तरतूद त्याने उर्वरित 40000 रुपयामधून केली तर अधिक फायदा होईल. त्यामुळे त्याची बचत जास्त होईल. आता महत्वाचा प्रश्न म्हणजे रॉबिन एवढी बचत करू शकेल का? महिन्याच्या इतर खर्च, मोबाईल, कार, फॉरेन ट्रिप यासारखे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बरेच पैसे लागणार आहेत. सुरुवातीच्या काही वर्षांसाठी रॉबिनला या सगळ्या खर्चांवर कंट्रोल ठेवावा लागेल. त्याचे अनेक मित्र IPhone वापरत असतील मात्र घर आणि चांगली रिटायरमेंट यासारखे मोठे उद्दिष्ट गाठायचे असतील तर IPhone, महागडी कार, दर वर्षी फॉरेन ट्रिप या गोष्टींपासून त्याला सुरुवातीचे काही वर्ष लांब राहावं लागेल. 30% पगार साठवून जर त्याने घराच्या डाउनपेमेंटसाठी पैसे साठवले तर घराचं स्वप्न लवकर पूर्ण होईल आणि जास्त कर्ज घ्यावं लागणार नाही. 20% पगारातून तो जी इक्विटीमध्ये गुंतवणूक करतोय, त्यातून लॉन्ग टर्म वेल्थ क्रिएट होईल. अश्या पद्धतीने 50 30 20 चा फॉर्म्युला वापरला तर सगळे उद्दिष्ट पूर्ण होतील. करिअरच्या सुरुवातीला थोडा त्रास झाला तरी भविष्यात खऱ्या अर्थाने चांगलं आयुष्य जगता येईल.

Published: April 19, 2024, 12:12 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App