महिना 10000 रुपये = मुलांच्या भवितव्यासाठी 80 लाखांची तरतूद !

करीमचा मुलगा सध्या 3 वर्षाचा आहे, म्हणजे पुढच्या 15 वर्षानंतर त्याला ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घ्यावी लागेल. शिक्षणाचा महागाई दर साधारण 7 % जरी गृहीत धरला तरी 15 वर्षानंतर याच 10 लाखाच्या कोर्ससाठी साधारण 27 लाख रुपये लागतील. तसेच, उच्च शिक्षण किंवा लग्नासाठी किमान 25 लाख तरी खर्च करावेच लागतील. म्हणजे करीमला मुलाचं शिक्षण आणि लग्न यासाठी किमान 50 लाखाची तरतूद करावी लागेल. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे त्याला ही रक्कम जमवण्यासाठी कुठे आणि किती गुंतवणूक करावी लागेल, चला तर मग जाणून घेऊया.

करीम आणि सलमान गुंतवणुकीसंदर्भात चर्चा करत होते. करीमचा मुलगा 3 वर्षाचा आहे. करीमच्या होम लोनचा EMI चालू होता, त्यामुळे अजूनपर्यंत त्याने मुलाच्या शिक्षणासाठी गुंतवणूक चालू केली नाहीये. मात्र, आता त्याने जॉब स्विच केला आहे, त्याच्या पगारात दर महिन्याला 20000 रुपयाची वाढ होणार आहे. या वाढलेल्या पगारातून मुलाच्या शिक्षणासाठी गुंतवणूक चालू करण्याचा त्याचा विचार आहे. सलमान, मी महिन्याला 20000 रुपयाची गुंतवणूक केली तर मुलाच्या शिक्षण आणि लग्नासाठी किती पैसे जमा होतील, असं करीम विचारतो. तू कुठे गुंतवणूक करतो, त्यावर तुझा रिटर्न अवलंबून आहे, असं सलमान त्याला सांगतो. आपल्यापैकी अनेक लोकं मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक चालू करतात, मात्र ती गुंतवणूक पुरेशी आहे का आणि लक्ष्य सध्या करण्यासाठी किती रिटर्न मिळाला पाहिजे, याच उत्तर अनेक गुंतवणूकदारांकडे नसतं. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

करीमने कुठे गुंतवणूक करावी, ते जाणून घेण्याआधी आपण त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी किती रक्कम आवश्यक आहे, ते आधी जाणून घेऊया. मुलाच्या बारावीपर्यंतचा खर्च करीम त्याच्या पगारातून करू शकतो. मात्र, उच्च शिक्षणासाठी त्याला तरतूद करावी लागेल. सध्या काळात मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर 3 किंवा 4 वर्षाच्या कोर्ससाठी किमान 10 लाख रुपये लागतात. शिक्षणासाठी आपण खर्च करत नाही, तर ती सर्वात मोठी गुंतवणूक असते. त्यामुळे, सिम्बायोसिससारख्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे असेल तर ग्रॅज्युएशनसाठी किमान 10 लाख रुपये लागतात. करीमचा मुलगा सध्या 3 वर्षाचा आहे, म्हणजे पुढच्या 15 वर्षानंतर त्याला ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घ्यावी लागेल. शिक्षणाचा महागाई दर साधारण 7 % जरी गृहीत धरला तरी 15 वर्षानंतर याच 10 लाखाच्या कोर्ससाठी साधारण 27 लाख रुपये लागतील. तसेच, उच्च शिक्षण किंवा लग्नासाठी किमान 25 लाख तरी खर्च करावेच लागतील. म्हणजे करीमला मुलाचं शिक्षण आणि लग्न यासाठी किमान 50 लाखाची तरतूद करावी लागेल. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे त्याला ही रक्कम जमवण्यासाठी कुठे आणि किती गुंतवणूक करावी लागेल, चला तर मग जाणून घेऊया.

मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमवायचे असतील तर बँक RD, PPF, सोनं, लाईफ इंश्युरन्स पॉलिसी, म्युच्युअल फंड्स, सुकन्या समृद्धी योजना आणि शेअर्स असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचे काही फायदे आणि काही तोटे आहेत. मात्र, आपण यापैकी 2 किंवा 3 चांगले ऍसेट निवडले आणि त्याच एक कॉम्बिनेशन बनवलं तर चांगला पोर्टफोलिओ तयार होऊ शकतो. त्याने इक्विटी फंड्स आणि गोल्ड बॉण्डमध्ये प्रत्येकी 5 5 हजार रुपयाची गुंतवणूक करावी, असा आमचा सल्ला आहे. करीमने दर महिन्याला 5000 रुपयाची SIP इक्विटी फंड्समध्ये केली तर, यातून तो मुलाच्या शिक्षणाची तरतूद करू शकतो. त्याच्या मुलाचं वय सध्या 3 वर्ष आहे, शिक्षणासाठी त्याच्याकडे 15 वर्ष आहेत. त्यामुळे, करीमने पुढच्या 15 वर्षांसाठी इक्विटी फंडमध्ये दर महिन्याला 5000 रुपयाची गुंतवणूक केली आणि त्यावर वार्षिक 12% रिटर्न मिळाला, तर मुलाच्या 18 व्या वर्षी त्याला म्युच्युअल फंड्समधून 23 लाख 82 हजार रुपये मिळतील. याच बरोबर मुलाच्या लग्नासाठी त्याच्याकडे आणखी 22 वर्षाचा कालावधी आहे, पुढचे 22 वर्ष करीम गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करू शकतो. या गुंतवणुकीवर अडीच टक्के व्याज आणि 10% सोन्याच्या किमतीतली वाढ, असा एकूण 12% रिटर्न मिळू शकतो. यामुळे, 22 वर्ष प्रति महिना 5000 रुपयाची गुंतवणूक करून करीमला तब्बल 59 लाख 10 हजार रुपये मिळतील. SIP मधून 23 लाख 82 हजार आणि गोल्ड बॉण्डमधून 59 लाख 10 हजार असे त्याला एकूण 82 लाख 92 हजार रुपये मिळतील. तुम्हीदेखील मुलांच्या शिक्षण आणि लग्नासाठी गुंतवणूक चालू करण्याचा विचार करत असाल तर म्युच्युअल फंड्स आणि गोल्ड बॉण्डच्या या कॉम्बोमध्ये गुंतवणूक करा.

Published: April 24, 2024, 13:25 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App