पर्सनल लोन घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

अन-सिक्युरड लोन असल्यामुळे, पर्सनल लोनचा व्याजदर जास्त असतो. त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण पर्सनल लोन घेताना नियम आणि अटी नीट समजून घेतल्या नाही तर हे लोन आपल्याला आणखी महागात पडू शकतं. त्यामुळे, पर्सनल लोन घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते आता जाणून घेऊया.

पर्सनल लोन हे सर्वात सहज मिळणारं लोन आहे. कमी वेळेत आणि कमी कागदपत्रांसह पर्सनल लोन देता यावं म्हणून बँकांनी टेक्नॉंलॉजीची मदत घेतली आहे. बजाज फायनान्ससारख्या NBFCs नी या सेगमेंटचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने या कंपन्या क्रेडिट प्रोफाइल तपासतात आणि प्री-एप्रुव्हड पर्सनल लोन सॅंक्शन करतात. पर्सनल लोनचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे हे लोन घेताना आपल्याला पैसे कुठे वापरणार आहोत ते सांगावं लागत नाही. त्यामुळे, मेडिकल इमरजेंसी, लग्न, फॉरेन ट्रिप, शिक्षण, घराचं रिनोव्हेशन यासारख्या कोणत्याही कारणासाठी पर्सनल लोन घेता येतं. मुळात हे अन-सिक्युरड लोन असल्यामुळे, पर्सनल लोनचा व्याजदर जास्त असतो. त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण पर्सनल लोन घेताना नियम आणि अटी नीट समजून घेतल्या नाही तर हे लोन आपल्याला आणखी महागात पडू शकतं. त्यामुळे, पर्सनल लोन घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते आता जाणून घेऊया.

पर्सनल लोन घेताना सगळ्यात आधी प्रोसेजिंग फी आणि व्याजदर विचारा. पर्सनल लोनवर साधारण 1 ते 4% प्रोसेसिंग फी असते. मात्र, तुमची क्रेडिट प्रोफाइल चांगली असेल तर बँक प्रोसेसिंग फी कमी करू शकते. पर्सनल लोन घेताना 2 ते 3 वित्तीय संस्थांकडे एन्क्वायरी केली तर प्रोसेसिंग फी आणि व्याजदराची तुलना करता येईल. ही व्याजदराची तुलना केवळ आपल्याकडेच ठेऊ नका. समजा तुम्हाला कोटक 2% प्रोसेसिंग फी आणि वार्षिक 12% व्याजदराची ऑफर दिली असेल तर ती ऑफर ICICI किंवा HDFC ला सांगा. तुमची कोटकपेक्षा चांगली ऑफर दिली तर मी तुमच्याकडून लोन घेईन, असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवा. बँकांमध्ये स्पर्धा खूप वाढली आहे, त्यामुळे ग्राहकाला आपल्याकडे टिकवण्यासाठी बँका आणि NBFC बार्गेनिंगला तयार होतात. त्याचा नक्की फायदा घ्या.

कोणाकडून पर्सनल लोन घ्यायचं हे एकदा निश्चित झालं कि मग तुम्हाला लोनची रक्कम आणि परतफेडीचा कालावधी ठरवावा लागेल. पर्सनल लोन महाग असतात, त्यामुळे त्याची लवकरात लवकर परतफेड करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण जर लोनचा कालावधी खूप जास्त घेतला तर खूप जास्त व्याज भरावं लागेल आणि कालावधी खूप कमी घेतला तर जास्त EMI भरावा लागेल. त्यामुळे, EMI आणि व्याज यांच्यातला सुवर्णमध्य आपल्याला काढावा लागेल. ग्रोच्या EMI कॅल्क्युलेटरचा वापर करून तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकता. या कॅल्क्युलेटरनुसार जर पर्सनल लोनचा व्याजदर 12% आणि परतफेडीचा कालावधी 5 वर्ष असेल, तर 5 लाखाच्या लोनसाठी 11122 रुपये EMI भरावा लागेल. 5 वर्षात व्याजापोटी साधारण 1 लाख 67 हजार रुपये खर्च करावे लागतील. याच कर्जासाठी जर परतफेडीचा कालावधी आपण 3 वर्ष घेतला तर EMI येतो 16600 रुपये आणि व्याजासाठी एकूण 97 हजार 800 रुपये खर्च करावे लागतात. म्हणजे 2 वर्ष कमी कालावधी घेतला तर जवळपास 70000 रुपयाची बचत होईल. या EMI कॅल्क्युलेटरच्या मदतीने आधी होम वर्क करा आणि मग लोनचा कालावधी ठरवा. तुमचं जर जुनं होम लोन चालू असेल तर त्यावर तुम्ही टॉप-अप लोनदेखील घेऊ शकता. टॉप अप लोनसाठी परतफेडीचा कालावधी 15 वर्षापर्यंत मिळू शकतो. त्यामुळे, तुम्हाला जास्त रकमेची गरज असेल आणि EMI कमी भरायचा असेल तर टॉप-अप लोनचा पर्याय फायदेशीर ठरेल. अश्या प्रकारे पर्सनल लोन घेण्याची आधी एनालिसिस केलं तर कमी खर्च होईल.

Published: April 26, 2024, 12:38 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App