• पेंट सेक्टरमध्ये गुंतवणूक करावी का?

    मागच्या काही दिवसात आदित्य बिर्ला ग्रुपने पेंट् सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. दुर्लक्षित असणाऱ्या या सेगमेंटमध्ये आता आणखी स्पर्धा वाढेल का, एशियन पेंट्सच्या वर्चस्वाला धक्का पोहोचेल का, पेंट सेक्टरचा बिझनेस आऊटलूक कसा आहे आणि या सेक्टरमध्ये कोणत्या शेअरमध्ये गुंतवणुकीची संधी आहे, चला तर या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.

  • स्मॉलकॅप शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी?

    आपण स्मॉल आणि मिडकॅप शेअर्स आणि म्युच्युअल फंडमध्ये प्रॉफिट बुक करावा का, तसेच नवीन SIP थांबवण्याची गरज आहे का, का हि नवीन गुंतवणुकीची संधी आहे, असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहे. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.

  • टुरिसम सेक्टरच्या वाढीचा कोणाला फायदा?

    2016 17 मध्ये कंपनीचं NSE आणि BSE वर लिस्टिंग करण्यात आलं. व्हिसा ऍप्लिकेशनशी संबंधित सेवा पुरवणारी ही भारतातली एकमेव लिस्टेड कंपनी आहे. कंपनी सध्या 20 पेक्षा जास्त देशांसाठी व्हिसा सर्व्हिस पुरवते.

  • डिजिटल अकॉउंट - खर्च कमी, फायदे जास्त

    डिजिटल सेविंग अकॉउंट हे एक ऑनलाईन सेविंग अकॉउंट आहे. आपण ते बँकेच्या वेबसाईटवर किंवा अँप डाउनलोड करून उघडू शकतो. आपल्या हातात असणाऱ्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून आपण हे अकॉउंट अगदी सहज उघडू शकतो. सामान्य सेविंग अकॉउंटप्रमाणे यावर देखील आपल्याला व्याज मिळतं.

  • म्युच्युअल फंडचं मर्जर म्हणजे काय?

    जेव्हा एखाद्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये असणारे होल्डिंग्स दुसऱ्या एका फंडमध्ये ट्रान्स्फर केले जातात, त्याला स्कीमचं मर्जर म्हणतात. कधी कधी एक फंड बंद करून त्याचं दुसऱ्या फंडमध्ये विलीनीकरण केलं जातं, तर काही केसेस मध्ये दोन्ही फंड बंद करून एक नवीन फंड बनवला जातो. मात्र, मर्जरनंतर फंडच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीमध्ये, तसेच एक्सपेन्स रेशिओ, रिस्क प्रोफाइल आणि टॅक्सेशनमध्ये काही बदल होणार आहेत का, ते बघितलं पाहिजे.

  • कोणत्या ट्रॅक्टर शेअरमध्ये चांगला रिटर्न

    जगात कितीही टेक्नॉलॉजी विकसित झाली तरी शेवटी पोट भरण्यासाठी अन्नधान्याची गरज लागणारच आहे. त्यामुळे, इथून पुढच्या काळात शेती व्यवसायाचा GDP मध्ये असणारा वाटा कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे. हा आकडा आहे तसाच राहील किंवा यामध्ये वाढ होण्याची देखील शक्यता आहे. असं झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यात ते जास्तीतजास्त गुंतवणूक करतील. याचा ट्रॅक्टर कंपन्यांना फायदा होईल.

  • क्योंकी हर एक रुपैय्या जरुरी होता हैं !

    पूर्वी बरेच लोकं रीमाप्रमाणे सेविंग अकॉउंटमध्ये पैसे ठेवायचे. मात्र आता काळ बदलला आहे. टेक्नॉलॉजीमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. UPI, नेट बँकिंग, T+0 सेटलमेंटसारख्या गोष्टींमुळे गुंतवणुकीचं विश्व पूर्णपणे बदललं आहे. मग अश्या परिस्थितीत सेविंग अकॉउंटला दुसरा चांगला पर्याय आहे का, ते आपण जाणून घेतलं पाहिजे.

  • इलेक्ट्रिक पेक्षा हायब्रिड कारला पसंती

    देशात ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत दिवसेंदिवस घट होतांना दिसतेय.2023 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 90 टक्के अशी विक्रमी उच्चांकी वाढ झालेली असताना फेब्रुवारी 2024 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री पाच महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर पोहचलीय. 2023 मध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत झालेली 8 टक्के वाढ ही दहा पटीहून अधिक होती.

  • म्युच्युअल फंड्समध्ये डर के आगे जीत हैं!

    मार्केट खाली आलं तर गुंतवणूकदार घाबरून जातात, आणखी लॉस होऊ नये म्हणून म्युच्युअल फंड्समधून पैसे काढून घेतात. मात्र, मार्केट खाली येत असताना म्युच्युअल फंडचे युनिट रिडिम करणं, ही अतिशय चुकीची स्ट्रॅटेजी आहे. ज्या वेळेला आणखी गुंतवणूक करून चांगला रिटर्न कमावण्याची संधी असते, त्या वेळेला जर आपण पैसे काढून घेतले तर आपलं डबल नुकसान आहे.

  • श्रीराम पिस्टन्स शेअरमध्ये तेजीचे संकेत?

    श्रीराम पिस्टन्स ही मोठी आणि नामांकित कंपनी आहे. त्यामुळे कंपनीकडे 4 व्हीलर सेगमेंटमध्ये मारुती, महिंद्रा, होंडा, टाटा मोटर्स, फोर्ड आणि निसानसारखे नामांकित ग्राहक आहेत. 2 व्हीलर सेगमेंटमध्ये हिरो, बजाज, यामाहा, TVS सारखी प्रत्येक कंपनी या कंपनीची ग्राहक आहे. एवढंच नाहीतर कंपनीकडे जॅग्वार, लँड रोव्हर, JCB, BMW, फोक्सवॅगन आणि कमिन्ससारखे MNC ग्राहक देखील आहेत.