फुल टाइम ट्रेडिंग कधी चालू करावं?

आपण कोर्समध्ये सांगितलेल्या स्ट्रॅटेजीनुसारच ट्रेडिंग करतोय, मग लॉस का होतोय हा प्रश्न हार्दिकला पडला आहे. फ़िन्फ्ल्यूएंसरने आपली फसवणूक केली, असं तो सगळीकडे सांगू लागला. मात्र, या लॉससाठी जितका फ़िन्फ्ल्यूएंसर जवाबदार आहे तितकंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त हार्दिक स्वतः जवाबदार आहे.

सौरभला ट्रेडिंग करायची इच्छा आहे. तो सध्या मुंबईमध्ये एका मीडिया कंपनीत काम करतोय. मात्र, पगाराव्यतिरिक्त थोडा साईड इन्कम असावा अशी त्याची इच्छा आहे. निफ्टी आणि बँकनिफ्टी ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग केलं तर दर महिन्याला 30 ते 40 हजर रुपयाचा इन्कम सहज जनरेट होऊ शकतो, असं सौरभचा मित्र त्याला सांगतो. ऑप्शन ट्रेडिंगवर आधारित एका फ़िन्फ्ल्यूएंसरच्या युट्युब चॅनलला सौरभने सबस्क्राईब केलं. तो रोज त्याचे व्हिडीओ पाहू लागला. फ़िन्फ्ल्यूएंसर रोज वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी चॅनलवर शेअर करायचा. कँडलस्टिक्स, टेक्निकल एनालिसिस, इंडिकेटर, ऑप्शन चेन एनालिसिस, OI डेटा अश्या अनेक गोष्टींची माहिती तो फ़िन्फ्ल्यूएंसर देत होता. त्याने केलेल्या ट्रेड्सची माहितीदेखील तो रोज युट्युब चॅनलवर टाकत होता. कधी 20000 तर कधी 50000 रुपये प्रॉफिट झाला असं संगीत जायचं. लोकांचा विश्वास बसावा म्हणून तो प्रॉफिटचे स्क्रीनशॉट व्हिडीओमध्ये दाखवायचा. ते बघून सौरभने हिशोब करायला सुरुवात केली. दिवसाला 20 किंवा 50 नाही पण आपल्याला 10000 रुपये जरी मिळाले आणि महिन्यातले 20 दिवस ट्रेडिंग केलं तरी सहज 2 लाख रुपया कमावू शकतो, असा तो विचार करत होता. दिवसातले 1 किंवा 2 तास ट्रेडिंग करून जर एवढे पैसे मिळणार असतील तर नोकरी कशाला करायची असा विचार त्याच्या मनात आला.

सौरभ ज्या फ़िन्फ्ल्यूएंसरचे व्हिडीओ बघत होता, तो व्हिडीओच्या मध्ये पेड टेलिग्राम चॅनलची आणि त्याच्या शेअर मार्केट कोर्सची जाहिरात करायचा. हा व्यक्ती फ्रीमध्ये जर एवढ्या भारी शिकवतो तर पेड कोर्स आणि टेलिग्राम चॅनलवर खूप चांगला कन्टेन्ट असेल हा विचार सौरभच्या मनात आला. त्याने 50000 रुपये भरून टेलिग्राम चॅनल आणि शेअर मार्केट कोर्स जॉईन केला. कोर्स संपल्यावर नोकरी सोडून फुल टाइम ट्रेडिंग करण्याचा त्याने निर्णय घेतला. आधी ट्रेडिंगमधून बक्कळ पैसा कमवू, नंतर ब्ल्यूचिप शेअर्सचा चांगला पोर्टफोलिओ बनवू, पॉश एरियामध्ये 4 BHK फ्लॅट घेऊ, एक भारीतलं ऑफिस खरेदी करू असे अनेक स्वप्न सौरभ बघत होता. फ़िन्फ्ल्यूएंसरने सांगितलेल्या स्ट्रॅटेजीनुसार त्याने ट्रेडिंग चालू केलं, मात्र त्याला काही केलं तरी पैसे मिळत नव्हते. कधी 5 10 हजारच प्रॉफिट व्हायचा तर दुसऱ्या दिवशी लगेच 15 20 हजारच लॉस व्हायचा. आपण कोर्समध्ये सांगितलेल्या स्ट्रॅटेजीनुसारच ट्रेडिंग करतोय, मग लॉस का होतोय हा प्रश्न सौरभला पडला आहे. फ़िन्फ्ल्यूएंसरने आपली फसवणूक केली, असं तो सगळीकडे सांगू लागला. मात्र, या लॉससाठी जितका फ़िन्फ्ल्यूएंसर जवाबदार आहे तितकंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त सौरभ स्वतः जवाबदार आहे.

हा प्रकार आपल्या आजूबाजूला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. कोविडनंतर अनेक नवीन गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये एंट्री केली आहे. सुदैवाने मार्केटमध्ये मोठी तेजी आली, त्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी करून चांगला पैसा मिळाला आहे. मात्र, यामुळे शेअर मार्केटमधून पैसे कमावणं सहज शक्य आहे असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. शेअर मार्केटमध्ये एंट्री करायला एक डिमॅट अकॉउंट आणि 10 20 हजार रुपये भांडवल या दोनच गोष्टी लागतात. त्यामुळे, चालू करून बघू या विचाराने गुंतवणूकदार एंट्री करतात. सुरुवातीला युट्युबवर फ्री व्हिडीओ बघतात, नंतर पेड कोर्स जॉईन करतात आणि एवढं सगळं करून शेवटी लॉसचं होतो. आपल्या बाबतीत असं होऊ नये, यासाठी आपण काय करावं ते आता जाणून घेऊया. ज्या प्रमाणे आपण आधी ग्रॅज्युएशन पूर्ण करतो, नंतर पोस्ट ग्रॅड्युएशन आणि मग PHD करतो. 12 वी नंतर डायरेक्ट PhD करणं शक्य आहे का, याच उत्तर तुम्हाला माहित आहे. त्याच प्रकारे फंडामेंटल आणि टेक्निकल एनालिसिस शिकल्याशिवाय डायरेक्ट फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग करणं शक्य नाहीये. सुरुवात करायला हरकत नाही, मात्र त्यात फार यश मिळणार नाही.

Published: April 17, 2024, 16:55 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App