-
तुमच्या आयुष्यावर आणि उत्पन्नावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या
-
यंदा दुष्काळामुळे ऊस उत्पादनात घट होणार असल्यानं सरकारनं यंदाच्या गळित हंगामात साखरेपासून इथेनॉल निर्मितीऐवजी साखर निर्मितीवर भर देण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत
-
अदानी समूहाला अमेरिकेकडून क्लिन चिट मिळाल्यानंतर अदानी समूहाच्या सर्वच शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. अदानी ट्रान्समिशनमध्ये 11 टक्के, अदानी ग्रीनमध्ये 17 टक्के, अदानी इंटरप्रायझेसमध्ये 9.5 टक्के, अदानी पोर्टमध्ये साडे आठ टक्के, अदानी पॉवरमध्ये सुमारे सहा टक्के तेजी दिसून आलीय. अमेरिकेमधील इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने हिंडेनबर्गनं अदानी समूहावर लावलेले सर्वच आरोप फेटालळे आहेत. तसेच अदानी श्रीलंकेत कंटेनर टर्मिनल उभारण्यासाठी 4,600 कोटी रुपयांहून अधिक कर्ज दिले आहे
-
सध्या अनेक IPO बाजारात येत आहेत. गुंतवणुूकदारांना चांगला लिस्टिंग गेनही मिळत आहे. मात्र, गुंतवणूक करताना आयपीओचा इश्यू साईज पाहून गुंतवणूक करा
-
कपडे तयार करणाऱ्या कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरणार आहे.
-
सध्या आयपीओतून चांगली कमाई करता येते. आयपीओ लागल्यानंतर त्यातून बाहेर कधी पडावं पाहा.
-
LIC विमा बाजारात मोठी खळबळ माजवणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात एलआयसी निश्चित परतावा देणारी योजना बाजारात आणणार आहे.या योजनांमुळे एलआयसीच्या नवीन हप्त्यांची वाढ ही दोन अंकी होणार आहे. या योजनेत पॉलिसीधारकांना निश्चित परतावा तर मिळणारच आहे . त्यासोबतच आयुष्यभर सम-एश्योर्ड रक्कमेच्या दहा टक्के परतावा देखील मिळणार आहे
-
शेअर स्वस्तात खरेदी करायचा आणि त्याची किंमत वाढली कि तो विकायचा, एवढंच आपल्यापैकी अनेकांना माहित आहे. मात्र, शेअरहोल्डर म्हणून आपले इतर अधिकार काय आहेत, हे आपल्याला माहित नाहीये. कंपनीच्या कोणत्याही महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत शेअरहोल्डर सहभागी होऊ शकतो, याबद्दल भारतात अजून जागरूकता नाहीये. कंपन्यांच्या निर्णय प्रक्रियेत शेअरहोल्डर सक्रिय नाहीयेत.
-
आरबीआयनं पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्सह सर्वच किरकोळ कर्ज देणाऱ्या उत्पादनाबाबत नियम कठोर केले आहेत. या नियमामुळे बँका आणि NBFC ना असुरक्षित कर्जासाठी 125 टक्के गुंतवणूक वेगळी ठेवावी लागणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या बँकेनं किंवा NBFC नं एक लाख रुपयाचं असुरक्षित कर्ज दिल्यास त्यांना त्याबदल्यात सव्वा लाख रुपये वेगळे ठेवावे लागणार आहेत. आतापर्यंत एक लाख रुपयांच्या कर्जावर एक लाखच वेगळे ठेवावे लागत होते. आरबीआयच्या या निर्णयानंतर बँकिंग क्षेत्रातील आणि NBFC च्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.
-
IPO च्या माध्यमातून भांडवल उभारणाऱ्या कंपन्या आणि IPO गुंतवणूकदार या दोघांसाठीही 2023 हे वर्ष अतिशय चांगलं होतं. अनेक IPO 20 30 आणि 50 पटींपेक्षा जास्त ओव्हर सबस्क्राईब झाले. त्यामुळे, कंपन्यांना अपेक्षित भांडवल मिळालं, आणि चांगला लिस्टिंग गेन मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांची चांगली कमाई झाली आहे. सगळ्याच IPO मध्ये गुंतवणूकदारांना पैसे मिळाले, असं म्हणता येणार नाही. ज्यांनी IPO चं व्यवस्थित एनालिसिस करून गुंतवणूक केली आहे, त्यांना मात्र चांगला फायदा झाला आहे. मात्र, IPO मार्केटमध्ये आता बबल तयार झाला आहे, अशी चर्चा अनेक अनुभवी गुंतवणूकदार करत आहेत.